ऑपरेशन सिंदूरचा लोगो कुणी अन् किती वेळात तयार केला माहितीये? नाही तर, मग वाचाच…

Who Is Designer Of Operation Sindoor Logo : ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हटलं की डोळ्यासमोर सर्रकन येते ती पाकिस्तानचं कंबरडं मोडणारी कारवाई आणि त्याचा लोगो. डार्क काळ्या रंगाचं बॅकग्राऊंड अन् त्यावर कॅपिटल बोल्ड अक्षरात लिहिलेलं OPERATION SINDOOR आता लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच परिचित झालं आहे. पण, लष्करी कारवाईचा हा लोगो नेमका कुणी आणि किती वेळात बनवला? असा प्रश्न देशातील करोड नागरिकांच्या मनात असून, आता या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे.
Operation Sindoor : सौदीतच ठरला इस बार बडा करेंगेंचा प्लॅन; 45 सिक्रेट बैठका अन्…;
लोगोमध्ये O च्या जागी वाटीतील सिंदूर
सिंदूरच्या स्पेलिंगमध्ये समाविष्ट असलेल्या ‘ओ’ च्या जागी, सिंदूर प्रतीकात्मकपणे एका वाडग्यात ठेवले आहे, पण हे सिंदूर वाडग्यातून विखुरलेले दाखवण्यात आले आहे. हे पसरलेले सिंदूर रक्ताचे प्रतीक आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात निर्घृणपणे मारल्या गेलेल्यांचे रक्त असे यातून दर्शवण्यात आले आहे. यालाच प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्याने ६-७ मे च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर लिहिलेल्या फोटोने सोशल मीडिया गजबजून गेले होते.
Operation Sindoor : मैं दिल में आता हूँ, समझ में नहीं; मोदींच्या कुंडलीत नेमकं काय लपलंय?
कुणी बनवला लोगो?
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर त्याबाबत नव-नवीन माहिती समोर येत असून, या कारवाईच्या लोगोबाबत लष्करानेच खुलासा केला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चा हा ‘लोगो’ भारतीय लष्कराच्या मुख्यालयात तैनात असलेले कर्नल हर्ष गुप्ता आणि हवालदार सुरिंदर सिंग यांनी तयार केल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे. लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीत हा लोगो बनवण्यासाठी फक्त ४५ मिनिटांचा कालावधी लागल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, अवघ्या ४५ मिनिटात बनलेल्या या लोगोचा प्रभाव इतका जबरदस्त होता की यातील दोन शब्दांची सर्जनशील रचना संपूर्ण ऑपरेशनची कहाणी सांगून जाते.
‘ऑपरेशन सिंदूर’ नाव का ठेवलं?
पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना हिंदूंना लक्ष्य केलं होतं. पुरूषांना टार्गेट करून मारण्यात आलं, यामध्ये अनेक महिला विधवा झाल्या. त्यांच्या पतींना त्यांच्यासमोरचं गोळ्या घालून त्यांना निवडकपणे मारण्यात आले. एका नवविवाहित महिलेच्या पतीला तिच्या समोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. दहशतवाद्यांनी त्या महिलेला सांगितले की, जाऊन मोदींना हे सांग. या मोहिमेला दिलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंजुरी दिली होती.