‘त्या’ चुकीची किंमत इंदिरा गांधी यांनी आपल्या जीवाने चुकवली; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चितंबरम यांचं धक्कादायक विधान
चिदंबरम यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ऑपरेशन ब्लू स्टारवरील गेल्या सहा महिन्यांतील हे दुसरं मोठं विधान आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चितंबरम यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल मोठ वक्तव्य केलं आहे. (Congress) त्यांच्या या वक्तव्याची देशभरात चर्चा होत आहे. जून 1984 मध्ये अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातून अतिरेक्यांना हाकलून लावण्यासाठी सुरू करण्यात आलेले ऑपरेशन ‘ब्लू स्टार’ हे चुकीचे पाऊल होतं. या चुकीची किंमत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या जीवाने चुकवली. तथापि, हा निर्णय एकट्या इंदिरा गांधींचा नव्हता.लष्कर, पोलीस, गुप्तचर आणि प्रशासकीय अधिकारी देखील यात सामील होते असं चिदंबरम म्हणाले आहेत.
चिदंबरम यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ऑपरेशन ब्लू स्टारवरील गेल्या सहा महिन्यांतील हे दुसरं मोठं विधान आहे. यापूर्वी, 4 मे रोजी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते 1984 चे ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक असल्याचं सांगत होते. “1980 च्या दशकात काँग्रेस पक्षाने केलेल्या कोणत्याही चुकांची जबाबदारी मी घेण्यास तयार आहे असंही ते म्हणाले होते. इंडिया एक्सप्रेसनुसार, चिदंबरम शनिवारी हिमाचल प्रदेशातील कसौली येथे पोहोचले. त्यांनी खुशवंत सिंग साहित्य महोत्सवात पत्रकार हरिंदर बावेजा यांच्या ‘दे विल शूट यू, मॅडम’ या पुस्तकावरील चर्चेत भाग घेतला त्यामध्ये बोलत होते.
मोठी बातमी, संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बजावली नोटीस
इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टार सुरू करण्याच्या निर्णयाची किंमत त्यांच्या जीवाने चुकवली. यावर चिदंबरम यांनी उत्तर दिले, “कोणत्याही लष्करी अधिकाऱ्याचा अपमान न करता, मी असे म्हणू इच्छितो की सुवर्ण मंदिर परत मिळवण्याचा हा चुकीचा मार्ग होता. काही वर्षांनंतर, आम्ही लष्कराशिवाय ते परत मिळवण्याचा योग्य मार्ग दाखवला. ब्लू स्टार हा चुकीचा मार्ग होता. मला वाटते की श्रीमती गांधींनी त्यांच्या जीवाने त्या चुकीची किंमत चुकवली.पंजाबच्या माझ्या भेटींदरम्यान, मला जाणवले की खलिस्तान किंवा अलिप्ततेची राजकीय मागणी जवळजवळ संपली आहे. आजची मुख्य समस्या आर्थिक आहे. पंजाबमध्ये सर्वाधिक बेकायदेशीर स्थलांतरित आहेत.
दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केलेल्या विधानांमुळे काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या अधिकृत सूत्रांनुसार, काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने चिदंबरम यांच्या अलीकडील विधानांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चिदंबरम वारंवार अशी विधाने करत आहेत असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने म्हटलं आहे. अशा विधानांची गरज नाही. पक्षाने सर्वस्व सोपवलेल्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी सावधगिरी बाळगून बोलावे, कारण पक्षाला अडचणीत आणणारी विधाने वारंवार करणे योग्य नाही असंही ते म्हणाले.