Plastic Currency: दहा आणि वीस रुपयांच्या प्लॉस्टिक नोटांना केंद्राची मंजुरी; लवकरच होणार प्रायोगिक वापर
10-20 Rupees notes-कागदी नोटांच्या तुलनेत पॉलीमर नोटांची टिकाऊपणा आणि आयुष्य किती अधिक आहे, याची चाचणी घेणे हा आरबीआयचा उद्देश.
RBI 10-20 Rupees Polymer Banknotes: भारतातही आता जगातील अनेक देशांप्रमाणे पॉलीमर (RBI 10-20 Rupees Polymer Banknotes) नोटा वापरात येण्याचा मार्ग मोकळा झालाय. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 10 आणि 20 रुपये मूल्याच्या पॉलीमर नोटांच्या प्रायोगिक वापराचा प्रस्ताव मांडला होता. त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली असल्याचे माहिती संसदेत देण्यात आली आहे.
अर्थ मंत्रालयाने संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. कागदी नोटांच्या तुलनेत पॉलीमर नोटांची टिकाऊपणा आणि आयुष्य किती अधिक आहे, याची चाचणी घेणे हा आरबीआयचा उद्देश असल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलंय.
MPSC : औषध निरीक्षकपदाचा पेपर फुटला? गुन्हा दाखल होणार…MPSC ने स्पष्ट सांगितलं
आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या शिफारशीनंतर 10 आणि 20 रुपयांच्या मूल्याच्या प्रत्येकी 100 कोटी पॉलीमर नोटा जारी करून त्यांचा प्रायोगिक वापर करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास या दोन्ही मूल्यवर्गातील पॉलीमर नोटा नियमितपणे चलनात आणल्या जातील. मात्र, पॉलीमर नोटांचा वापर सध्या प्रारंभिक टप्प्यात असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले असल्याचे अर्थ मंत्रालयाने संसदेत माहिती दिलीय.
पॉलीमर नोटांची गरज का भासली?
कागदी नोटांच्या तुलनेत पॉलीमर नोटांचे अनेक फायदे आहेत. आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार, प्लास्टिकपासून तयार केलेल्या या नोटा कागदी नोटांपेक्षा अधिक काळ टिकतात. त्या पाण्यामुळे खराब होत नाहीत, सहज फाटत नाहीत आणि घाम किंवा घाण यांचा त्यांच्यावर कमी परिणाम होतो. विशेषत 10 आणि 20 रुपयांसारख्या कमी मूल्याच्या नोटांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्या लवकर झिजतात. त्यामुळे पॉलीमर नोटा अधिक उपयुक्त ठरू शकतात.
जुन्या कागदी नोटा बंद होणार का?
याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडली आहे. नवीन पॉलीमर नोटा विद्यमान कागदी नोटांसोबतच चलनात राहतील. कागदी नोटा पूर्णपणे बंद करण्याचा किंवा त्याऐवजी फक्त पॉलीमर नोटा आणण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही.
अभिनेत्री जास्मीन भसीन गेल्या महिन्यापासून आजारी, आरोग्याविषयी केला ‘हा’ मोठा खुलासा
डिजिटल व्यवहारांवर काय परिणाम होणार?
प्लास्टिकच्या नोटा आल्याने यूपीआय (UPI) आणि डिजिटल व्यवहारांवर काही परिणाम होईल का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अर्थ मंत्रालयाने सांगितले की, पॉलीमर नोटांचा नियमित वापर सुरू झाल्यानंतरच याचे अचूक मूल्यांकन करता येईल. सरकारचे मत आहे की, कागदी किंवा पॉलीमर नोटा आणि डिजिटल पेमेंट व्यवस्था या एकमेकांच्या पूरक आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी दोन्ही पर्याय उपलब्ध राहतील.