हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी झालीय. यात तीन जणांचा मृत्यू झालाय. तर 53 हून अधिक जण बेपत्ता आहे. काही कुटुंबातील सर्वच सदस्य हे बेपत्ता आहेत.
बिजू जनता दलाच्या माजी खासदार ममता मोहंती यांनी आज भाजपात प्रवेश केला. मोहंती यांनी याआधीच बीजेडीचा राजीनामा दिला होता.
पूजा खेडकरला कुणी अधिकाऱ्यांनी मदत केली का याचाही तपास करा असे आदेश दिल्ली पटियाला कोर्टाने दिले.
सर्वोच्च न्यायालयाने एससी-एसटी आरक्षणाचा लाभ एकाच कुटुंबाला वारंवार मिळणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे.
परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना आणखी एक धक्का बसला असून दिल्ली पटियाला न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
राहुल गांधी भविष्यात देशाचे पंतप्रधान असू शकतील असा दावा प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी एका कार्यक्रमात केला.