नवी दिल्ली : साहित्य क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठित संस्था मानली जाणारी साहित्य अकादमीच्या (Sahitya Akademi) अध्यक्षपदी माधव कौशिक (Madhav Kaushik) यांची निवड झाली आहे. आज सकाळी अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. मराठी साहित्यिक रंगनाथ पठारे (Rangnath Pathare) हे देखील निवडणूक रिंगणात होते. आधीच्या मराठी उमेदवारापेक्षा पठारे यांनी अधिकचा प्रचार देखील केला होता. पण त्यांचा विजय होऊ शकला नाही. […]
FSSAI : उन्हाळा आला की आपल्याला सगळीकडे बाजारात आंब्याचा वास दरवळू लागतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बाजारात मोठ्या प्रमाणात केमिकलच्या मदतीने पिकवलेल्या आंब्यांची विक्री वाढली आहे. केमिकलच्या मदतीने पिकवलेल्या आंब्यांना नैसर्गिक पद्धतीने पिकलेल्या आंब्यांसारखी चव नसते. हीच बाब लक्षात घेत आणि ग्राहकांची होणारी फसवणूक लक्षात घेत FSSAI म्हणजेच अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने महत्वाचे आदेश […]
Direct Tax Collection : प्रत्यक्ष कर संकलनात केंद्र सरकारने मोठी उडी घेतल्याचे चित्र पाहण्यात आले आहे. 2022-23 या आर्थिक वर्षातील 10 मार्चपर्यंतच्या प्रत्यक्ष कर संकलनाचे आकडे वित्त मंत्रालयाने जाहीर केले आहेत. या आकडेवारीत वाढ होताना दिसत असून, जाहीर आकडेवारीनुसार सरकराने 10 मार्चपर्यंत प्रत्यक्ष कर संकलाद्वारे 13.73 लाख कोटी जमा केले आहेत, अशी माहिती CBDT ने […]
मुंबई : काँग्रेसचे सर्व अधिकार मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्याकडे गेले आहेत. यावर काँग्रेसच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. हे नाराज झालेले नेते निवडणूक आयोगाकडे (Election Commission) जाणार आहे. खर्गेंनी घेतलेले निर्णय काँग्रेसच्या संविधानाविरोधात असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि माजी आमदार अशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केला आहे. काँग्रेसच्या नाराज नेत्यांनी दिल्लीत नामावंत वकिलांची भेट […]
Infosys : इन्फोसिसचे अध्यक्ष मोहित जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जोशी गेल्या दिर्घकाळापासून दिग्गज आयटी कंपनीत इन्फोसिसमध्ये कार्यरत होते. इन्फोसेसेला रामराम केल्यानंतर आता जोशी ऑटो सेक्टरमधील दिग्गज कंपनी टेक महिंद्रामध्ये रूजू होणार आहेत. जोशी यांची टेक महिंद्रा कंपनीत MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इन्फोसिसचे विद्यमान MD आणि CEO सीपी गुरनानी […]
नवी दिल्ली : जमीन-नोकरी घोटाळा (Land Jobs Scam) प्रकरणात लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढत आहेत. सीबीआयने यापूर्वी लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi) यांची चौकशी केली होती. यानंतर आता त्यांचा मुलगा तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सीबीआयने (CBI) तेजस्वी यादवला […]