किरकोळ दबाव आला अन् नितीश कुमार बदलले; राहुल गांधींनी सांगितलं खरं
Rahul Gandhi News : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यावर किरकोळ दबाव आला अन् नितीश कुमार बदलले, असल्याची टीका करीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खरं सांगितलं आहे. दरम्यान, भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र आलेल्या घटक पक्षातील जनता दलाचे नितीश कुमार यांनी पुन्हा भाजपची वाट धरली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यावर बोलताना राहुल गांधींनी त्यांच्यावर टीका केली आहे.
हेमंत सोरेन 31 तासांनंतर रांचीत, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदार भावूक; ईडीकडून अटकेची शक्यता>‘400 च काय 200 जागाही अशक्य, प्रभू श्रीराम भाजपाला माफ करणार नाही’; राऊतांचा घणाघात
ज्यात घडलेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर नितीश कुमार यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर नितीश कुमार नवव्या वेळेस राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. यावेळेस त्यांच्या सोबतीला भाजप आहे. नितीश कुमार यांच्याबरोबर भाजपाचे विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांनी मागील 24 वर्षात नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारच्या राजकारणात असा योग साधणारे नितीश कुमार हे एकमेव नेते आहेत. नितीश कुमार यांच्यानंतर भाजपाचे दोन उपमुख्यमंत्री आणि अन्य सहा जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
मी ओबीसींसाठी लढणार, पदाची चिंता नाही, त्यांना जाऊन सांगा मला काढायला; भुजबळ आक्रमक
बिहारमधील महाआघाडीच्या सरकारमधून बाहेर पडत नितीश कुमार यांनी आज राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांची (भाजप) इच्छा असेल तर आजच नव्या सरकारचा शपथविधी होईल असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपनेही वेळ न दवडता होकार दिला आणि आजच नितीश कुमार यांच्यासह भाजपाच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. याव्यतिरिक्त भाजपाचे डॉ. प्रेमकुमार, जेडीयूचे विजय कुमार चौधरी, बिजेंद्र प्रसाद यादव, श्रावण कुमार, हम पक्षाचे संतोष कुमार सुमन आणि अपक्ष आमदार सुमित कुमार सिंग यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.