Rahul Gandhi : ‘मला फरफटत नेताना पोलिस कानात बोलले, हे सरकार घालवा’…

सरकार माझ्यासोबत जे वर्तन करतंय, त्याची चिंता नाही परंतू सरकारने विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीय करायला हवं, असं खासदार राहुल गांधी म्हणाले आहेत.

Rahul Gandhi

Rahul Gandhi News : मला पोलिसांनी फटफटत नेलं पण ‘हे सरकार घालवा’ असं पोलिस कानात बोलल्याचं कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi News) यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं आहे. नीट पेपर लिक प्रकरणी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन करताना राहुल गांधी यांना पोलिसांनी फरफटत नेल्याचं दिसून आलं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अमानूषपणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आहे. या संपूर्ण घडामोडींनंतर राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, मला पोलिसांनी फरफटत नेलं परंतू कानात म्हणत होते की, या सरकारला हटवा, मी राजस्थानचा आहे, या सरकारला हटवा आम्ही फक्त वर्दी घातली. दुसरा पोलिस कर्मचारी हरियाणाचा होता तोही म्हणत होता. पोलिस कर्मचाऱ्यांमध्येही अशीच परिस्थिती आहे. सत्य परिस्थिती सर्वांना माहिती आहे. त्यांना ऑर्डर ऐकावीच लागते. पोलिसही खूश नाहीत. समजदार पोलिस म्हणतात की, विद्यार्थ्यांसोबत हा गुन्हा आहे. आम्ही ज्यांच्यावर प्रेम करतो जे भारताचे भविष्य आहे त्यांच्योसोबत अपराध केला गेलायं. या गर्दीत पोलिस आपल्या मुलांना पाहू शकत होते, असं राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय.

व्हायरल पत्र बनावट; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचा दावा खोटा

तसेच कॉंग्रेस पक्ष 100 टक्के विद्यार्थ्यांच्या मागणीचे समर्थन करीत आहे. माझ्यासोबत झालेल्या वर्तनाबद्दल मला चिंता नाही. माझ्यासोबत जे वर्तन झाले त्यापेक्षा पाच पट अधिक चुकीचे वर्तन माझ्यासोबत होऊ द्या, परंतू सरकारचं विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना या सरकारच्या पद्धतीत बदल हवा आहे. माझ्या तोंडातून रक्त निघत होतं, परंतू आम्ही विद्यार्थ्यांच्या मागणीवर ठाम होतो, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

माझ्यासोबत जो प्रकार घडला, त्या गोष्टींची मला सवय आहे.यामध्ये काहीही अडचण नाही. भारतातील विद्यार्थी, तरुण, शेतकऱ्यांच्या प्रश्न मांडणे हे माझं काम आहे. मला विरोधी पक्षनेता म्हणून माझं कर्तव्य पार पाडायचं आहे. मला भारताच्या जनतेचा आवाज बनायचं आहे. ज्या ठिकाणी वेदना आहेत, त्याकडे मला सरकारचं लक्ष वेधायचं आहे. जनतेच्या इच्छांचा आदर करणे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मी खूप काही सहन करण्यास तयार असल्याचंही राहुल गांधी यांनी स्पष्ट केलंय.

follow us