सशस्त्र दलांनी युद्धासाठी सज्ज राहावे, राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
भारत हा शांतताप्रिय देश आहे, पण वाढती आव्हाने पाहता शांतता राखण्यासाठी आपल्या सशस्त्र दलांनी नेहमी युद्धासाठी तयार असले पाहिजे - राजनाथ सिंह

Rajnath Singh: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी भारतीय लष्कराला (Indian Army) सूचक इशारा दिला आहे. भारत हा शांतताप्रिय देश आहे, पण वाढती आव्हाने पाहता शांतता राखण्यासाठी आपल्या सशस्त्र दलांनी नेहमी युद्धासाठी (war) तयार असले पाहिजे, असं विधान राजनाथ सिंह यांनी केलं.
Kamal Hasan : AI च्या शिक्षणासाठी 69 व्या वर्षी कमल हसन अमेरिकेला…
उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे बुधवारपासून सुरू झालेल्या पहिल्या जॉइंट कमांडर्स कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. या परिषदेत देशाचे संयुक्त सर्वोच्च-स्तरीय लष्करी नेतृत्व सहभागी झाले होते, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात देशासमोरील वर्तमान आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा केली.
अर्थखात्यासारखं नालायक खातं नाही, दहा वेळा माझी फाईल माघारी…; गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र
यावेळी राजनाथ सिंह यांनी रशिया, युक्रेन आणि इस्रायल-हमास संघर्ष आणि बांगलादेशातील सद्यस्थितीचा संदर्भ देत सूचक इशारा दिला. ते म्हणाले की, भारत एक शांतताप्रिय राष्ट्र आहे. शांतता टिकवून ठेवण्यासाठी सशस्त्र दलांनी युद्धासाठी सज्ज असले पाहिजे. संयुक्त लष्करी दृष्टीकोन विकसित करणे आणि भविष्यातील संभाव्य युद्धांमध्ये देशाला कोणत्या प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लादू शकते, यासाठी तयारी करणे आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
पुढं ते म्हणाले की, जागतिक अस्थिरता असूनही भारतात शांतता आहे. मात्र, वाढती आव्हाने पाहता सतर्क राहण्याची गरज आहे. अमृतकाळात आपली शांतता अबाधित राखणे महत्वाचे आहे. आपण आपल्या वर्तमानावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवले पाहिजे आणि भविष्याभिमुख होण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी आपल्याकडे मजबूत राष्ट्रीय सुरक्षा धोरण असायला हवे,असं ते म्हणाले.
डेटा आणि आर्टिफिशिय इंटेलिजन्सच्या क्षेत्रात देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन सिंह यांनी लष्करी नेतृत्वाला केले. हे घटक कोणत्याही संघर्षात किंवा युद्धात थेट सहभागी होत नाहीत. पण त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग युद्धाची दिशा ठरवत असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले.