आता देशभर एल्गार! मोदींना गुडघ्यावर आणणारा नेता कुस्तीपटूंसाठी आखाड्यात

आता देशभर एल्गार! मोदींना गुडघ्यावर आणणारा नेता कुस्तीपटूंसाठी आखाड्यात

Rakesh Tikait :  कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ गुरुवारी मुझफ्फरनगरमध्ये महापंचायत झाली. यामध्ये भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यासह अनेक खाप नेते सहभागी झाले होते. यावेळी राकेश टिकैत म्हणाले की, महापंचायतीत खेळाडूंच्या बाजूने निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी कुरुक्षेत्रात निकाल सुनावण्यात येणार आहे. खाप प्रतिनिधी राष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टिकैत म्हणाले की, ही खाप सभा सौरम या ऐतिहासिक गावात होत आहे. गेल्या ४०-४५ दिवसांपासून हा वाद सुरू आहे. या देशाच्या घटनेने शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. हा आमचा मूलभूत अधिकार आहे. शांततेत आंदोलन करत असताना त्यांना उचलून नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते 40 दिवस खोटे बोलत राहिल्याचा आरोप लावत राहिले.

‘त्या’ वादाला धार येताच गेहलोतांचा डाव! राजस्थानातील लोकांना दिलं मोठं गिफ्ट

राकेश टिकैत पुढे म्हणाले की POCSO मध्ये आधी अटक आणि नंतर तपास व्हायचा पण त्यांच्यासाठी कायदा वेगळा आहे. खापचे प्रतिनिधी राष्ट्रपतींना भेटणार असून कुरुक्षेत्रात निकाल जाहीर होणार आहे. ते म्हणाले की, येथे जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. वीरांची जात नसते. ही सरकारची चाल आहे. जात, समाज आणि धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडली जात आहे. ते म्हणाले की, जो देशासाठी लढतो त्याच्याकडे फक्त तिरंगा जात असतो. परदेशात देशाच्या तिरंग्यालाच मान्यता आहे.

‘त्या’ वादाला धार येताच गेहलोतांचा डाव! राजस्थानातील लोकांना दिलं मोठं गिफ्ट

त्यामुळे आता या आंदोलनामध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांची एंट्री झाली आहे. राकेश टिकैत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या कृषी विधेयकांना जोरदार विरोध केला होता. त्यांनी दिल्लीमध्ये मोठे आंदोलन उभे केले होते. त्यांच्या या आंदोलनाने खुद्द पंतप्रधान मोदींना गुडघे टेकायला भाग पाडले होते. यामुळे मोदींना हे विधेयक मागे घ्यायला लागले होते. त्यामुळे आता याप्रकरणामध्ये देखील राकेश टिकैत मोदींना गुडघे टेकायला भाग पाडणार असे बोलले जात आहे.

दरम्यान,  शेतकरी नेते टिकैत म्हणाले की उद्या कुरुक्षेत्रच्या पंचायतीत निकाल दिला जाईल. खाप समिती स्थापन केली जाईल. ही समिती राष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे. 5 तारखेला जिथे मीटिंग आहे तिथे आपण खेळाडूंना घेऊन जाऊ आणि या जुलमीला समर्थन करायचे की मुलांचे हे त्यांनाच ठरवायला सांगू, असेही ते म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube