नो इलेक्शनच्या तयारीसाठी ONOE चा प्लॅन; मोदींचं अर्थशास्त्र काढत राऊत गरजले

  • Written By: Published:
नो इलेक्शनच्या तयारीसाठी ONOE चा प्लॅन; मोदींचं अर्थशास्त्र काढत राऊत गरजले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने आज वन नेशन, वन इलेक्शन या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर विरोधकांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया समोर येण्यास सुरूवातत झाली असून, उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचा हा निर्णय म्हणजे भविष्यात नो इलेक्शनच्या तयारीसाठीचा प्लॅन असून शकतो असे म्हटले आहे. (Sanjay Rayt On One Nation One Election)

“एक देश एक निवडणूक लोकशाहीला पोषक नाहीच”; उल्हास बापटांचं परखड मत

राऊतांनी काढलं मोदीचं अर्थशास्त्र

एक देश एक निवडणूक घेऊन पैसे वाचवायचे आहेत तर, देशातली लूट थांबवा निवडणुकातील खर्च दिसतोय पण लुट दिसत नसल्याचे म्हणत मोदींना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं ? ते अर्थमंत्री कधी झाले? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला. याआधी निवडणूक झालेल्या आहेत. घटनेनुसार याआधी या गोष्टी झालेल्या आहेत, त्यांनी नवीन घटना लिहू नये असेही राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी दारोदारी फिरताहेत; चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल

काल (दि.18) जी वन नेशन वन इलेक्शनची घोषणा केलेली आहे ती 2029 ची तयारी आहे. जे नरेंद्र मोदी आणि त्यांच सरकार चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत. मुंबई महानगरपालिकेसह 14 महानगर पालिकांच्या निवडणुका घेऊ शकत नाहीत, जम्मू सारख्या राज्यात तीन – तीन वर्ष ते निवडणुका घेऊ शकले नाहीत त्यांनी वन नेशन वन इलेक्शनचा फंडा आणावा हे आश्चर्यकारक असल्याचेही राऊत म्हणाले.

रश्मी ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाला ठाकरेंच्या वाघीणीचाच ‘खो’; नाव न घेण्याचे कारणही दिले

बंद दाराआडच्या चर्चा सांगायच्या नसतात

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी जागा वाटपांबाबत खलबतं सुरू झाली असून, महाविकास आघाडीत काही जागांवरून मतभेद असल्याचे चित्र आहे. मविआमध्ये जागा वाटपावरून मतभेद नसून दुमत असू शकत यावर चर्चा होईल असे म्हणत मीडियातल्या बातम्या पेरलेल्या आहेत, खोट्या असल्याचे राऊत म्हणाले. बंद खोलीतल्या चर्चा बाहेर सांगायच्या नसतात. जागावाटप झाल्यानंतर ते लपून राहणार नाही. ज्यांनी ज्या बातम्या दिलेल्या आहेत ते काय आमच्यासोबत बैठकीला बसले होते का ? असा प्रश्नही राऊतांनी विचारला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ही राजकारणाची तेव्हाची गरज होती असेही राऊत म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube