कुस्तीपटूंच्या विरोधानंतर मोठा निर्णय! संजय सिंहसह पूर्ण कुस्ती संघ निलंबित
Sanjay Singh : संजय सिंह (Sanjay Singh ) यांची भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कुस्तीपटूंनी प्रचंड विरोध केला होता यादरम्यान आता क्रीडा मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांच्यासह नवनियुक्त भारतीय कुस्ती संघाची संपूर्ण कार्यकारणी निलंबित करण्यात आले आहे.
साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतली…
WFI म्हणजेच रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (WFI Elections 2023) निवडणुकीत ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्या गटाचे वर्चस्व दिसून आले होते. त्यांचे निकटवर्तीय संजय सिंह कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाले होते. संजय सिंह यांच्या विजयानंतर कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक (Sakshi Malik) हिने कुस्तीतून निवृत्ती घेतली. इतकंच नाही तर स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने (Bajrang Puniya) आपला पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांच्या घराबाहेर ठेवला होता.
Ahmednagar : आता संप हाच पर्याय! शिंगणापूर देवस्थानचे कामगार उद्यापासून संपावर
दरम्यान त्या अगोदर ब्रिजभूषण शरण सिंह हे भारतीय कुस्ती संघाचे तब्बल बारा वर्षे अध्यक्ष होते. 2011 पासून सलग तीनदा त्या पदावर निवडून आले होते. मात्र ते अध्यक्ष असताना महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप त्यांच्यावर कुस्तीपटूंकडून करण्यात आले होते. त्यासाठी जंतर-मंतरवर पहिलवानांनी कित्येक दिवस उपोषण देखील केले होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कुस्ती संघाच्या पुन्हा एकदा निवडणुका घेण्यात आल्या. मात्र यामध्ये देखील ब्रिजभूषण यांचे जवळचे असणारे संजय सिंह यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यामुळे खेळाडूंनी पुन्हा एकदा विरोध केला. तर खेळाडूंच्या या विरोधानंतर सरकारने संजय सिंह यांच्यासह संपूर्ण कुस्ती संघच निलंबित केला आहे.
राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? शर्मिला ठाकरेंचा एकच शब्द पण, सस्पेन्स कायम
बजरंग पुनियाने निर्णय खरा केला…
कुस्तीपटू साक्षी मलिकने (Sakshi Mailk) कुस्तीला अलविदा केल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनियानेही (Bajrang Punia) पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना माघारी केला आहे. पुरस्कार परत देण्याची घोषणा केल्यानंतर बजरंग पुनिया पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी गेला. निवासस्थानावर पोलिसांनी रोखल्याने घराजवळील फुटपाथवरच बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार ठेवला आहे.