Seema Haider: सीमा-सचिनची लव्हस्टोरी राष्ट्रपतींपर्यंत धडकली

Seema Haider: सीमा-सचिनची लव्हस्टोरी राष्ट्रपतींपर्यंत धडकली

Seema Haider: पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिन मीना यांची प्रेमकहाणी आता राष्ट्रपतींपर्यंत पोहोचली आहे. एकीकडे युपी एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहेत तर दुसरीकडे या प्रकरणात दररोज काही ना काही नवीन घडामोडी होताना दिसत आहेत. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दयेचा अर्ज करत सीमाला भारतीय नागरिकत्व देण्याची विनंती करण्यात आली आहे.

याचिकेत म्हटले होते की, सीमा ही भारताची सून आहे आणि तिचे लग्न सचिनसोबत झाले आहे. तिला पाकिस्तानात पाठवू नये. तिने हिंदू धर्म स्वीकारला आहे. याचिकेसोबत सचिन आणि सीमाचे लग्न करतानाचे अनेक फोटोही पाठवण्यात आले आहेत. लग्नाच्या फोटोंमध्ये सीमा आणि सचिनसोबत चार मुलंही दिसत आहेत. तिने पाकिस्तानातून त्यांना सोबत आणले होते.

राष्ट्रपतींकडे याचिका
सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील एपी सिंग यांच्या वतीने राष्ट्रपतींकडे याचिका पाठवण्यात आली आहे. याचिकेत ज्येष्ठ वकील एपी सिंह यांनी म्हटले आहे की, असे अनेक लोक आहेत ज्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. मग ते बांगलादेशी असोत, पाकिस्तानी असोत किंवा इतर देशांतील असोत. एका आरटीआयमधून मिळालेल्या माहितीचा हवाला देत सिंग यांनी सांगितले की, 5 वर्षांत 5,220 परदेशी नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. सीमा यांनाही नागरिकत्व मिळायला हवे.

महिला अत्याचारावरून मुख्यमंत्र्यांना सुनावणाऱ्या मंत्र्याची गेहलोत सरकारमधून हकालपट्टी

अधिवक्ता एपी सिंह यांनी आपल्या याचिकेत अनेक लोकांची उदाहरणे दिली आहेत. पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानमधील अनेक स्त्रिया आहेत, ज्यांनी भारतातील इतर अनेक शहरातील तरुणांशी लग्न केले आहे आणि आता त्या भारतात दीर्घकाळ वास्तव्य करत आहेत. त्यांना दीर्घ मुदतीचा व्हिसाही देण्यात आला आहे. सीमाने सचिनशी नेपाळमध्ये लग्न केल्याचा युक्तिवादही त्यांनी केला आहे. भारताचे नेपाळशी रोटी-बेटीचे नाते आहे.

याचिकेत असे म्हटले आहे की, सीमाचा पती गुलाम हैदरपासून चार वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. सीमा तिच्या वडिलांसोबत राहत होती. सीमाला नवीन जोडीदाराची गरज होती आणि तिला निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube