शरद पवारांचे सर्व खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला का? बजरंग सोनवणेंचा मोठा खुलासा
Sharad Pawar's MPs meeting PM Modi वर शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठा खुलासा केला आहे.
Sharad Pawar’s MPs meeting PM Modi Bajrang Sonawane makes a major revelation about reason behind meeting : देशाच्या राजकारणातील एक महत्त्वाची आणि चर्चेची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे लोकसभेतील सर्व आठ खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली संसद भवनात ही बैठक होणार असून राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या, पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मदतीसंदर्भात चर्चा केली जाणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. यावर आता शरद पवारांच्या खासदारांच्या मोदींबरोबरच्या भेटीवर शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठा खुलासा केला आहे.
नेमकं काय म्हणाले बजरंग सोनवणे?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कमी पाऊस, मागील वर्षीच्या पीकविम्याची रक्कम आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, या शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितल्याचे सोनवणे यांनी सांगितले.दरम्यान, जयंत पाटील आणि मुख्यमंत्री यांचा एकाच विमानातून प्रवास झाल्याबाबतही सोनवणे यांनी स्पष्टीकरण दिले. हा केवळ योगायोग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘आज नाही तर उद्या उत्तर द्यावेच लागेल’; अमित शाह यांच्यावर राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल
संसदेतील कामकाजाबाबत बोलताना सोनवणे यांनी इंडिया आघाडीच्या निर्णयानुसार भूमिका घेतली जाणार असल्याचे सांगितले. तसेच, संसदेत कामकाज सुरळीत न चालण्यास सत्ताधारी पक्षच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.यासंदर्भात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्याशी संवाद साधला.