Stock Market : शेअर बाजार आजही कोसळण्याची शक्यता आहे का?, काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?
Share Market : भारतीय इक्विटी इंडेक्स सर्व सेक्टर्सच्या विक्रीच्या दरम्यान, घसरणीसह बंद झालं. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 1,769.19 अंकांच्या अर्थात 2.10 टक्क्यांच्या घसरणीसह 82,497.10 वर बंद झाला (Share Market) आणि निफ्टी 546.80 अंकांच्या अर्थात 2.12 टक्क्यांच्या घसरणीसह 25,250.10 वर बंद झाला आहे.
आज बाजाराची स्थिती?
प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले की,फ्यूचर्स आणि ऑप्शन्स विभागातील बदल तसंच, मॅक्रो अनिश्चितता यांचा एकूण बाजाराच्या भावनेवर परिणाम झाला. गॅप-डाउन ओपनिंगनंतर, बेअर्सने बाजारात वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. यामुळे निफ्टीने महत्त्वाची सपोर्ट पातळी तोडली. 546.80 अंकांच्या घसरणीसह निफ्टी 50 इंडेक्स 25,250.10 वर बंद झाला.
China : भारतीय शेअर बाजार चीनमुळे कोसळतोय का?, FII ने विकले इतक्या कोटी रुपयांचे शेअर्स
मजबूत बियरिश कँडलसह हा इंडेक्स हायर टॉप हायर बॉटम फॉर्मेशन मालिकेतून ब्रेक डाउन झाला आहे. हे ट्रेंड रिव्हर्सलचे लक्षण आहे. पण खाल टाइम फ्रेमवर म्हणजे ऑवरली चार्टवर संपूर्ण बाजार खूपच ओवरसोल्ड दिसतो. अशा स्थितीत पुलबॅक रॅलीची गरज आहे. आता निफ्टीला पुढील मोठा सपोर्ट 25,000 किंवा 50DMA च्या स्तरावर आहे. त्याच वेळी, वरच्या बाजूस, 25,550-25,600 च्या झोनमध्ये रजिस्टंस दिसून येतो.
टॉप 10 शेअर्स कोणते?
बीपीसीएल (BPCL)
श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)
लार्सन अँड टूब्रो (LT)
ऍक्सिस बँक (AXISBANK)
रिलायन्स (RELIANCE)
हिंदुस्तान पेट्रोलियम (HINDPETRO)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
कमिन्स इंडिया (CUMMINSIND)
पर्सिस्टन्ट (PERSISTENT)
जुबिलंट (JUBLFOOD)
नोंद – क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.