वीर सावरकरांचे नाव न घेतल्याने देवधर भडकले; पोर्ट ब्लेअरमध्ये क्रू मेंबरला घेतले फैलावर

वीर सावरकरांचे नाव न घेतल्याने देवधर भडकले; पोर्ट ब्लेअरमध्ये क्रू मेंबरला घेतले फैलावर

Sunil Deodhar Aggressive on Indigo Airlines Crew Member : भाजप नेते सुनील देवधर ( Sunil Deodhar ) यांनी विमान प्रवास करत असताना अंदमानमधील पोर्ट ब्लेअर विमानतळावर आगमनाच्या घोषणेदरम्यान इंडिगो एअरलाइन्सच्या क्रु सदस्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव न घेतल्याने आक्षेप नोंदवला. या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ देवधर यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केला आहे.

Sunil Deodhar: पुण्याच्या स्थानिक प्रश्नांचे योग्य व सर्वंकष निराकरण होईल, यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करणार

हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केला. ज्यामध्ये त्यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि इंडिगो एअरलाइन्सला टॅग केलं आहे. तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात यावी. अशी मागणी देवधर यांनी याद्वारे केली आहे. देवधर यांनी लिहिलं आहे की, प्रिय इंडिगो, तुम्ही आगमनाच्या वेळी विशिष्ट विमानतळाचे नाव घोषित करा. जसे, इंदिराजींचे नाव दिल्लीला आल्यावर घेतले जाते, राजीवचे हैदराबादमध्ये. मग पोर्ट ब्लेअरला आल्यावर वीर सावरकरांच्या नावाची घोषणा का केली जात नाही?

देवधरांचा पुण्यात सव्वाशे वर्षांचा इतिहास; सुनील देवधरांनी टीकाकारांना सुनावले

असा सवाल करत देवधर यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व इंडिगो एअरलाईन्सला टॅग करीत त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व इंडिगो एअरलाइन्सने या ट्विटला प्रतिसाद देत याची आम्ही दखल घेतली आहे. असे कळवत त्यावर प्रतिसाद दिला आहे. दरम्यान सर्वच एअरलाइन्सने आपल्या घोषणांमध्ये हा बदल करावा. अशी अपेक्षा सुनील देवधर यांनी व्यक्त केली आहे.

काय आहे हा व्हिडीओ?

हे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे की पोर्ट ब्लेअर विमानतळावर आगमनाच्या घोषणादरम्यान इंडिगो एअरलाइन्सच्या कृ सदस्याने आगमनाची घोषणा केली त्यावर भाजपने ते सुनील देवधरे यांनी तात्काळ आक्षेप नोंदवत म्हटले की हे तुमचं कर्तव्य आहे या विमानतळाचे नाव वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ज्याप्रमाणे तुम्ही इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणतात त्याचप्रमाणे अंदमान मध्ये आल्यानंतर सावरकर यांचं नाव घ्यायलाच हवं. असं म्हणत यावेळी देवधर यांनी इतर विमान प्रवाशांना देखील यावर त्यांची सहमत विचारली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज