Video : अयोध्येत प्रभू श्रीरामाला ‘सूर्यतिलक’! डोळ्यांचं पारणं फेडणारा व्हिडिओ पाहिलात का?

  • Written By: Published:
Video : अयोध्येत प्रभू श्रीरामाला ‘सूर्यतिलक’! डोळ्यांचं पारणं फेडणारा व्हिडिओ पाहिलात का?

‘Surya Tilak’ illuminates Ram Lalla’s forehead at Ayodhya on the occasion of Ram Navami : देशभरात आज (दि.17) रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य राममंदिराच्या उद्धघाटन सोहळ्यानंतरची ही पहिलीच रामनवमी असून, यानिमित्त विशेष पूजा करण्यात आली. या सर्वामध्ये सर्व भक्तांचा आकर्षचा केंद्रबिंदू ठरले ते रामललावर करण्यात आलेला ‘सूर्यतिलक’ (Surya Tilak) या सूवर्ण क्षणाचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सूर्य तिलक पार पाडले. या सूर्य तिलकाचा व्हिडिओ अनोखा असून देशभरातील करोडो रामभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असा आहे. या अद्भूत सोहळ्याचे दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाममध्ये हॅलिकॉप्टरमध्ये बसून दर्शन घेतले. यावेळी त्यांनी हा क्षण माझ्यासाठी भावनिक असल्याचे म्हटले आहे.

Ayodhya : पहिले मुलाखत अन् मग काम; राम मंदिराचे दरवाजे बनवणाऱ्या MD ची घेण्यात आली होती परीक्षा

काय म्हणाले मोदी

पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी श्री रामजन्मभूमीचा हा बहुप्रतिक्षित क्षण सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. हे सूर्य तिलक विकसित भारताच्या प्रत्येक संकल्पाला आपल्या दैवी उर्जेने अशा प्रकारे उजळून टाकतील असे मोदींनी म्हटले आहे.

 

कसा करण्यात आला ‘सूर्य तिलक’ 

रामललाच्या खास सूर्य तिलकासाठी ऑप्टिकल मेकॅनिकल यंत्रणा तयार करण्यात आली आहे. यासाठी मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर 4 लेन्स आणि 4 आरसे बसवण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीने सूर्याची किरणे रामललाच्या कपाळापर्यंत पोहोचवण्यात आली आहेत. सूर्याची गरम किरणे थेट रामललाच्या कपाळावर पोहचावे यासाठी अनेक अष्टधातूचे पाइप बसवण्यात आले आहेत. सूर्य तिलकासाठी मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर शिखराजवळ ‘ऑप्टोमेकॅनिकल’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेला ‘सूर्य तिलक’ नाव देण्यात आले आहे.

सूर्यकिरणे एका जागेतून प्रवेश करतात आणि ही किरणे या उपकरणाच्या लेन्सवर पडतात. त्यानंतर ती परावर्तित करण्यात आली. यासाठी विशिष्ट प्रकारचा आरसा एका ठराविक कोनात बसविण्यात आला आहे. गाभाऱ्याच्या बाहेर असलेल्या ठराविक कोनातील आरशामुळे तेथून सूर्यकिरणे परावर्तित झाली आणि श्रीरामलल्लांच्या कपाळावर सूर्य तिलक करण्यात आले. प्रत्येक रामनवमीच्या दिवशी ऑप्टो-मेकॅनिकल या तंत्रज्ञानाच्या मदतीने रामललाचे सूर्य तिलक केले जाणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube