कर चुकवणाऱ्यांना आता शिक्षा नाही, फक्त दंड; निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा
Nirmala Sitharaman : आयकर विवरणपत्रे उघड न करण्यासाठी आता कोणतीही शिक्षा नसल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प 2026-27 च्या
Nirmala Sitharaman : आयकर विवरणपत्रे उघड न करण्यासाठी आता कोणतीही शिक्षा नसल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प 2026-27 च्या भाषणात बोलताना दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक व्यवहारांची तक्रार न केल्याबद्दल दंडाचे शुल्कात रूपांतर करण्याचा प्रस्ताव सुरू आहे. तसेच ऑडिट नसलेल्या ट्रस्टसाठीची अंतिम मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
तर 1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार असून अपघात विमा करमुक्त होणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. आयकर परतावा भरण्यासाठी आता 31 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यावर विचार करण्यात येत असल्याचे देखील त्या म्हणाल्या.
अघोषित उत्पन्नाची मर्यादा एक कोटी रुपयांपर्यंत
आपल्या भाषणात बोलताना निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा करत अघोषित उत्पन्नाची मर्यादा एक कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती दिली आहे. याच बरोबर आयकर रिटर्न 31 जुलैपर्यंत दाखल करता येणार असं देखील त्यांनी माहिती दिली आहे.
आयकर कायदे आणि कर संकलनाशी संबंधित प्रमुख घोषणा
नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार
Non‑debt receipts: 36.5 लाख कोटी
Net tax receipts: 28.7 लाख कोटी
कर्जाव्यतिरिक्त प्राप्ती: 36.5 लाख कोटी
निव्वळ कर प्राप्ती: 28.7 लाख कोटी
शिक्षण आणि आरोग्यासाठीचा टीसीएस दर 5% वरून 2% पर्यंत कमी केला
सुधारित विवरणपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली. नाममात्र शुल्क आकारून सुधारित विवरणपत्रे दाखल करण्यासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध असेल.
उच्च शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतीगृहे; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा
राज्यांसाठी 1.4 लाख कोटींची तरतूद
2026-27 च्या अर्थसंकल्पामध्ये राज्यांसाठी 1.4 लाख कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यानुसार राज्यांना आर्थिक स्वरुपाचे नियोजन करावे असं देखील निर्मला सीतारमण म्हणाल्या.
