मोठी बातमी! दिल्लीत स्फोट झालेल्या कारचा मालक कोण?, नाव आलं समोर

लाल किल्ला परिसरात सुभाष मार्गाजवळच्या सिग्नलजवळ हा स्फोट झाला. गृहमंत्री अमित शाहा यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 10T224300.976

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट झाला आहे. (Delhi) या स्फोटामुळे एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता या स्फोटाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. या कारमालकाचे नाव समोर आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

लाल किल्ला परिसरात सुभाष मार्गाजवळच्या सिग्नलजवळ हा स्फोट झाला. गृहमंत्री अमित शाहा यांनी हा स्फोट आय-20 या ह्युंदाई कंपनीच्या कारमध्ये झाल्याचं सांगितलं आहे. ही कार आता पोलिसांनी, फॉरेन्सिक टीमने ताब्यात घेतली असून तिची तपासणी केली जात आहे. कारमध्ये असलेले सर्व पुरावे गोळा केले जात आहे. या गाडीमध्ये नेमके काय होते? काही स्फोटकं होती का? याचा तपास केला जात आहे.

मोठा दहशतवादी कट उधळला ! जैश मॉड्यूलकडून 2 हजार 900 किलो स्फोटके जप्त

घटनास्थळाच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही आता ताब्यात घेतले जात आहेत. सीसीटीव्हींची चाचणी करून हा स्फोट नेमका कसा झाला, याचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत केलेल्या तपासातून आय-20 कारच्या मालकाचे नाव समोर आलं आहे. या कारची पासिंग हरियाणातील गुरुग्राम येथील असून कारचा मालक ही नदीम खान नावाची व्यक्ती असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, अमित शाहा यांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटाच्या घटनेची सर्व अंगांनी तपासणी केली जात आहे. तपासणीतून जे काही समोर येईल ते जनतेपुढे मांडले जाईल, असे अमित शाहा यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकी कोणती माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us