सुप्रीम कोर्टाने लक्ष्मण रेषा आखली; मोकळं सुटलेल्या ईडीचे हात बांधले, काय आहेत नवे आदेश?
Supreme Court On ED : सर्वोच्य न्यायालयाने गेली अनेक दिवसांपासून मोकळ्या मैदानात वावरणाऱ्या ईडी ( ED) विभागाचे जरा हात बांधले आहेत. न्यायालयाच्या निकालानुसार आता ईडी (ED) अधिकाऱ्यांना मोबाईल आणि लॅपटॅाप तपासण्याची अनुमती नाही. त्याचबरोबर मोबाईल, लॅपटॅापचा ॲक्सेस देता येणार नाही शिवाय डेटा कॅापी करता येणार नाही.
IRS अधिकारी राहुल नवीन यांची ईडीच्या संचालकपदी नियुक्ती, दोन वर्षासाठी सांभाळणार कार्यभार
या निर्णयासोबतच छापा टाकल्यानंतर संशयिताच्या खाजगी वस्तूंना हात लावता येणार नाही. विशेष करून इलेक्ट्रॅानिक वस्तू ताब्यात घेता येणार नसल्याचं कोर्चाने सांगितले आहे. नोव्हेंबरमध्ये “लॉटरी किंग” सँटियागो मार्टिन, त्याचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांवर ईडीने धाडी टाकल्या होत्या. या प्रकरणात कोर्टाने हा आदेश दिला आहे.