शेअर बाजाराची उच्चांकी सुरुवात; निफ्टी आणि मिडकॅपने केला नवा रेकॉर्ड, कोणते शेअर्स झळकले?
Stock Market : शेअर बाजार आज मोठ्या उसळीने उघडला आहे. यामध्ये सेन्सेक्स 200 हून अधिक अंकांच्या वाढीसह उघडला तर निफ्टी आणि मिडकॅप निर्देशांक नवीन विक्रमी उच्चांकावर उघडला. (Stock Market) आयटी शेअर्समध्ये आघाडी दिसून आली आहे. तर, एचसीएल टेकला सर्वाधिक (Market) फायदा झाला आहे.
त्याचबरोबर जागतिक बाजारातही चांगले संकेत मिळाले आहेत. गिफ्ट निफ्टी 91 अंकांनी वाढून 24,614 च्या आसपास होता. अमेरिकन फ्युचर्स मार्केटमध्ये डाऊ-नॅस्डॅक फ्युचर्सही हिरव्या रंगात होते. गेलेल्या शुक्रवारी अमेरिकन बाजारात पुन्हा उच्चांक तयार झाला होता. मात्र, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नुकत्याच झालेल्या हल्ल्याचा बाजारावर काही परिणाम होतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे.
एलआयसीची चांदी! 3 महिन्यात नफ्यात अडीच टक्के वाढ, कंपनी शेअर्सवर देणार इतका लाभांश
गेल्या आठवड्यात बाजार वाढीसह बंद झाला आणि निफ्टी प्रथमच 24500 च्या वर बंद झाला. आयटी कंपन्यांच्या चांगल्या निकालामुळे देशांतर्गत बाजारात सलग सहाव्या आठवड्यात तेजी कायम राहिली. दरम्यान, या आठवड्यात मुख्य लक्ष इन्फोसिस, रिलायन्स, कोटक महिंद्रा बँकेसह अनेक मोठ्या कंपन्यांवर असणार आहे. कारण, त्यांचे निकाल जाहीर होणार आहेत. अर्थसंकल्पपूर्व बाजारात चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती;एसआयपी लाच; जानेवारी ते जून एक लाख कोटींचा टप्पा ओलांडला
असित सी मेहताचे हृषिकेश येडवे म्हणाले की, निफ्टीच्या महत्त्वाच्या पातळींवर नजर टाकली तर निफ्टीला 24,600-24,620 हा टप्पा ओलांडावा लागेल, जेणेकरून नवीन तेजीला प्रोत्साहन मिळू शकेल. तोपर्यंत गुंतवणूकदारांनी निफ्टीच्या घसरणीवर खरेदीचा विचार करावा. 24,170 च्या आसपास निफ्टीला महत्त्वाचा सपोर्ट आहे.