लघुशंका प्रकरण; मुख्यमंत्र्यांनी आदिवासी मजुराचे पायं धुतले, औक्षण करत केला सन्मान…

लघुशंका प्रकरण; मुख्यमंत्र्यांनी आदिवासी मजुराचे पायं धुतले, औक्षण करत केला सन्मान…

मध्य प्रदेशातल एका मुजोर तरुणाने मद्यधुंद अवस्थेत आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका केल्याच्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आला होता. त्यावरुन मध्य प्रदेशातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन पेटलेलं असतानाच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीडित व्यक्तीचा सन्मान केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आदिवासी मजुराला भोपाळ इथल्या निवासस्थानी बोलवून घेत. त्याला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवून स्वत: त्याचे पाय धुतले आहेत. यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. एवढंच नाहीतर मुख्यमंत्री चौहान यांनी या मजुराला व्यक्तीचा टिळा लावत हार आणि शाल देऊन सन्मान केला आहे. तसेच मजुराला श्रीगणेशाची प्रतिमाही भेट म्हणून दिली आहे.

Video : अजितदादांची एन्ट्री राजीनाम्याची चर्चा, चेहऱ्यावर टेन्शन अन् शिंदे हसत म्हणाले आमदार…

तसेच यावेळी मजुराशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी त्याची विचारपूसही केली आहे. तू काय काम करतो, मुलांचं शिक्षण कसं सुरु आहे, शिष्यवृत्ती मिळते का? असे सवाल मुख्यमंत्री चौहान यांनी मजुराला केले आहेत. विशेष म्हणजे मजुराला मुख्यमंत्र्यांनी नाष्टाही ऑफर करीत हितगुज केलं.

गैरसोय, कुचंबणा झाली म्हणून गुरु बदलणारा माणूस मी नाही… समरजितसिंह घाटगेंचा मुश्रीफांना टोला

नेमक काय घडलं होतं?

पाले कोल असं या आदिवासी मजुराचं नाव असून तो करोंडी गावचा रहिवासी आहे. हा मजुर एका ठिकाणी बसलेला होता. या आदिवासी मजुराच्या जवळ येत या मुजोर प्रविण शुक्लाने मद्यधुंद अवस्थेत असताना मजुराच्या अंगावर लघुशंका केली होती. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता.

पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरेही मैदानात; थेट कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांच्या दारावर जाऊन साधणार संवाद

त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मजुराच्या अंगावर लघुशंका करताना प्रविण शुक्ला व्हिडिओमध्ये दिसून आला होता. मजुराच्या अंगावर, तोंडावर आणि डोक्यावर त्याने लघवी केली होती.

दरम्यान, संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी भाजपशी संबंधित असल्याच्या आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. मात्र, भाजपचे आमदार केदारनाथ शुक्ला यांनी आरोपी त्यांचा प्रतिनिधी नसल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश देण्यात आल्यानंतर व्हिडिओची दखल घेत पोलिसांकडून या मुजोर तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube