अंगणवाडी सेविकांना उर्दू भाषेचे प्राविण्य अनिवार्य; सरकारच्या निर्णयामुळे खळबळ

  • Written By: Published:
अंगणवाडी सेविकांना उर्दू भाषेचे प्राविण्य अनिवार्य; सरकारच्या निर्णयामुळे खळबळ

Urdu made mandatory for Anganwadi teachers : अंगणवाडी सेविकांना (Anganwadi Sevika) उर्दू भाषेतील प्राविण्य अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सरकारचा हा निर्णय अनेकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. उर्दू भाषेचे प्राविण्य अनिवार्य करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे.

धक्कायक! शाळेच्या ‘यशासाठी’ काळ्या जादूचा जीवघेणा प्रकार, इयत्ता 2 च्या मुलाचा गळा आवळून खून

कर्नाटक सरकारचा नेमका निर्णय काय?

कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने मुदिगेरे आणि चिकमंगळूरसारख्या मुस्लिम बहुल जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी शिक्षिकांसाठी उर्दू भाषा अनिवार्य करण्याचा आदेश जारी केला आहे. कर्नाटक सरकारने अंगणवाडी शिक्षिकांसाठी काढलेल्या या आदेशामुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! पासाविना घुसलेल्या महिलेचा हंगामा; मंत्रालयातील गृहमंत्री फडणवीसांचं कार्यालय फोडलं

विरोधकांककडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न

सिद्धरामय्या सरकारने जारी केलेल्या या आदेशानंतर एकीकडे चिंता व्यक्त केली जात असताना दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपने या मुद्द्यावरून राज्य सरकारला कोंडीत पकडण्यास सुरूवात केली आहे. भाजपने सिद्धरामय्या सरकारवर मुस्लिम तुष्टीकरणाचा थेट आरोप केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कन्नड भाषिक उमेदवारांच्या हक्कांचे उल्लंघन होऊ शकते आणि राज्याची भाषिक ऐक्य कमकुवत होऊ शकते, असा आरोप भाजप नेते नलिन कुमार कटील यांनी केला आहे.

काँग्रेसकडून टिपू सुलतान आणि निजामाच्या स्वप्नांना सत्यात बदलण्याचा प्रयत्न 

राज्य सरकारच्या या निर्णयावर बोलताना भाजप नेते नेते टीएन रवी म्हणाले की, “निजामने हैदराबादला उद्ध्वस्त केले. कर्नाटक परिसरात उर्दूचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या काळात कन्नड शाळांवर बंदी घालण्यात आली होती. टिपू सुलतानच्या काळात फारसी भाषा कन्नडवर लादण्याचा प्रयत्न केला.

एखाद्याने हल्ला केल्यावर टाळ्या वाजवत बसणार का?, बदलापूर एन्काउंटरवर फडणवीसांचं रोखठोक मत

आज काँग्रेस टिपू सुलताना आणि निजामाच्या स्वप्नांना सत्यात बदलण्याचा प्रयत्न करत असून, काँग्रेस नेते कन्नड विरोधी आहेत असल्याचे म्हटले आहे. कर्नाटकची राजभाषा कन्नड असतानाही उर्दू का लादली जात आहे, असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या मुदिगेरे कर्नाटकात असून, कन्नड ही कर्नाटकची अधिकृत भाषा आहे, अशा परिस्थितीत उर्दू अनिवार्य का..?? कृपया याचे उत्तर द्या अशी मागणी भाजपनं एक्सवर पोस्ट करत केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube