Anil Dujana Encounter : एके-47 बाळगणारा गॅंगस्टर अनिल दुजाना होता तरी कोण?

Anil Dujana Encounter : एके-47 बाळगणारा गॅंगस्टर अनिल दुजाना होता तरी कोण?

Anil Dujana Encounter: उत्तर प्रदेशातला कुख्यात गुंड अनिल दुजानाचा(Anil Dujana) पोलिसांनी एन्काऊंटर करुन ठार केलंय. नोएडामधील बदलापूर इथल्या दुजाना गावापासून अनिल दुजानाचा(Anil Dujana) गुन्हेगारी विश्वाचा प्रवास सुरु झाला होता. अनिल दुजानावर (Anil Dujana) एकूण 62 गुन्हे दाखल असून त्यापैकी 18 खूनाचे गुन्हे दाखल होते. आज उत्तर प्रदेश एसटीएफकडून त्याचा एन्काऊंटर करण्यात आलाय.

राष्ट्रवादीचा वजीर 40 आमदारांसह गायब होणार होता; शिंदे गटातील नेत्याचा गौप्यस्फोट

दुजानाचा डॉन म्हणून ओळख असलेला गुंड सुंदर भाटीवर अनिल दुजाने एके-47 ने हल्ला केल्याचा आरोप होता. 2002 पासून उत्तर प्रदेशात गुन्हेगारीचं वारं फिरत होतं. त्याचवेळी 2002 साली अनिल दुजानावर हरबीर पहिलवानाची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. (Uttar pradesh Crime)

हरबीर पहिलवानाच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशात महेंद्र फौज आणि सतबीर गुर्जर यांच्या वादामुळे दोन टोळी तयार झाल्या. वादानंतर अनेकदा टोळ्यांमध्ये युद्ध सुरु झाले होते. तदनंतर सुंदर भाटी-नरेश भाटी यांच्यात गॅंगवॉर सुरु झालं.

निवृत्तीच्या निर्णयावर पवार म्हणाले… येत्या 2 दिवसात अंतिम निर्णय घेऊ

नरेश भाटी जिल्हा पंचायतीचा अध्यक्ष झाल्यानंतर सुंदरने त्याची हत्या केली होती. त्यानंतर नरेश भाटीचा भाऊ रणदीप आणि पुतण्या अमि कसाना दोघांनी सुंदरचा बदला घेण्याचं ठरवलं. या घटनेनंतर दोघांनीही दुजानालाही टार्गेटवर ठेवले होते. सुंदर भाटीच्या मेहुणीच्या लग्नात रणदीप, दुजाना आणि कसाना यांनी गोळीबार केला होता. त्यामध्ये तिघेही ठार झाले मात्र, सुंदर भाटी जिवंत निसटला होता.

Maharashtra Politics : नव्या सरकार स्थापनेचा मुहुर्त ठरला? सरोदेेच्या दाव्याने खळबळ

2012 मध्ये अनिल दुजानाला तिहेरी हत्यांकाडाप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर जेलमधूनच आपली गॅंग चालवण्यास सुरुवात केली होती. यामध्ये त्याला रणदीप भाटी आणि अमित कसाना मदत करत असतं. अनिलने जेलमधूनच खून आणि खंडणीचे कट रचण्यास सुरुवात केली. सुंदर भाटी गॅंगने जानेवारी 2014 मध्ये दुजानाच्या घरावर हल्ला केला होता.

दिल्लीतील नंदनगरी इथल्या एका व्यावसायिकाला अनिल दुजानाच्या गॅंगने 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर अनिल दुजानी तब्बल 9 वर्षांनतर जानेवारी 2021 बाहेर आला होता. त्यानंतर त्याने 16 ऑक्टोबर 2021 रोजी सिंकदराबादच्या व्यवसायिकाकडेही 1 कोटी खंडणीची मागणी केली होती. या दोन्ही गुन्ह्यात तो वॉंटेड होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube