Video : अॅक्शन जोरदार असेल; पाकिस्तानला दम देत संरक्षण मंत्र्यांची ‘ऑपरेशन पहलगाम’ ची घोषणा

  • Written By: Published:
Video : अॅक्शन जोरदार असेल; पाकिस्तानला दम देत संरक्षण मंत्र्यांची ‘ऑपरेशन पहलगाम’ ची घोषणा

Rajnath Singh On Pahalgam Terror Attack : काश्मीरमधील पहलगाममध्ये निःशस्त्र पर्यटकांना मारणाऱ्या दहशवादी आणि त्यांच्या आकांच्या कृतीचं प्रत्युत्तर जोरदार पद्धतीने दिले जाईल, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी दिला आहे. कठोर शब्दांत इशारा देत एकप्रकारे सिंह यांनी ऑपरेशन पहलगामची घोषणाच केली आहे. सरकार आवश्यक आणि योग्य असे प्रत्येक पाऊल उचलेल. दहशतवादाविरुद्धचा हल्ला किती जलद आणि तीव्र असेल याचे संकेतही यावेळी सिंह यांनी दिले. ज्यांनी ही घटना घडवून आणली त्यांनाच नाही तर, पडद्यामागे हा रक्तरंजित खेळ खेळणाऱ्यांनाही अटक केली जाईल असा गर्भित इशारा  राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे.

Video : ‘जय हिंद’! नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीच्या दोन शब्दांनी संपूर्ण देश गहिवरला…

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काय म्हणाले?

मी देशवासियांना आश्वासन देतो की, पहलगाम (Pahalgam Terror Attack) घटनेवर भारत सरकार आवश्यक ते सर्व पाऊलं उचलेल. आम्ही फक्त हे कृत्य करणाऱ्यांवरच कारवाई करू असे नाही तर, ज्यांनी पडद्यामागे बसून भारतीय भूमीवर असे नापाक कृत्य करण्याचा कट रचला आहे त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल. भारताला अशा दहशतवादी कृत्यांनी घाबरवता येणार नाही असे म्हणत या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना लवकरच जोरदार प्रत्युत्तर दिलेले दिसेल.

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानला धडकी; इलाका तुम्हारा धमाका हमारा, भारताकडून मोठे संकेत

संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी (२३ एप्रिल २०२५) जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान, तिन्ही दलांचे प्रमुख, संरक्षण सचिव आणि लष्कराचे लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक उपस्थित होते. संरक्षणमंत्र्यांनी सशस्त्र दलांना दहशतवादविरोधी कारवाया तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत आज (दि.23) सायंकाळी ६ वाजता सीसीएसची बैठक होणार आहे. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत हा हल्ल्याला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यावर मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube