ब्रेकिंग! 1 जुलैनंतर नोंदणी केलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क नाही, प्रशासनाचा मोठा निर्णय
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाद्वारे अंतिम केलेली मतदारयादी वापरण्यात येणार आहे.

Municipal Elections Pune : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाद्वारे अंतिम केलेली मतदारयादी वापरण्यात येणार आहे. ही यादी 1 जुलै 2025 रोजी अंतिम करण्यात आली असून, त्यानंतर नावनोंदणी केलेल्या नवीन मतदारांना या निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क मिळणार नाही. आयोगाच्या माहितीनुसार, शहरातील सुमारे 35 लाख मतदारांना या निवडणुकीत मतदानाची संधी मिळणार आहे.
मतदारांची यादी घेऊन
पुढील माहिती देताना निवडणूक अधिकारी (Municipal Elections Pune) प्रसाद काटकर यांनी सांगितले की, यापूर्वीच्या महापालिका निवडणुकांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मतदारांची यादी घेऊन ती प्रभागनिहाय आणि मतदान केंद्रानिहाय विभागली जात असे. मात्र या वेळी केवळ राज्य निवडणूक आयोगाकडून मिळालेली यादीच वापरण्याचे आदेश आहेत, स्थानिक पातळीवरून यादी घेण्यास परवानगी (Pune News) नाही. महापालिकेला आयोगाकडून ही यादी मिळाली असून लवकरच प्रभागनिहाय विभागणी सुरू होईल.
निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण
याशिवाय, आगामी निवडणुकीसाठी महापालिकेच्या अंतिम प्रभागरचनाला (Voters Registered) मान्यता देण्यात आली असून, काही दिवसांत प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले जाईल. त्यानंतर निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण दिले जाईल.
एक प्रभाग पाच सदस्यांचा
पुणे महापालिकेच्या 2011 च्या लोकसंख्येच्या आकडेवारीवर आधारित ही निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी 41 प्रभागांमधून 165 नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यापैकी 40 प्रभाग चार-चार सदस्यांचे असतील, तर एक प्रभाग पाच सदस्यांचा असेल. या पाच सदस्यांच्या प्रभागांमध्ये प्रभाग क्रमांक 38 (बालाजीनगर-कात्रज-आंबेगाव) सर्वात मोठा आहे, जिथे लोकसंख्या सुमारे 1,23,000 इतकी आहे.