लोकसभेत वक्फ विधेयक सादर, विरोधकांचा गदारोळ, मंत्री रिजिजू म्हणाले, “विधेयक आणलं नसतं तर..”

Waqf Amendment Bill Updates : केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज वक्फ संशोधन विधेयक 2024 लोकसभेत (Waqf Amendment Bill 2024) सादर केले आहे. मंत्री रिजिजू यांनी विधेयक सादर करताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. विधेयक सादर केल्यानंतर बोलताना रिजिजू यांनी हे विधेयक आणणं का महत्वाचं होतं हे देखील स्पष्ट केलं.
रिजिजू म्हणाले, आज जर आम्ही वक्फ संशोधन विधेयक आणलं नसतं तर संसद भवन देखील वक्फ बोर्डाची संपत्ती झाले असते. संसद भवनावरही वक्फने द दावा केला आहे. यूपीए सरकारने त्यांच्या काळात दिल्लीतील 123 संपत्ती वक्फला देऊन टाकल्या होत्या.
विरोधकांचं हृदय परिवर्तन होईल
आम्ही विधेयक खुल्या मनाने सादर केलं आहे. याआधी देखील संशोधन करण्याचे प्रयत्न केले होते. याआधी कधीच विधेयकला गैर संवैधानिक म्हणून संबोधले गेले नव्हते. या विधेयकावर 25 राज्यांनी काही शिफारसी सुचवल्या आहेत. आता वक्फ बोर्डाच्या कोणत्याही निर्णयाला आव्हान दिले जाऊ शकेल. आता जे या विधेयकाला विरोध करत आहेत त्यांचं नक्कीच हृदय परिवर्तन होईल असा विश्वास मंत्री रिजिजू यांनी व्यक्त केला.
कायद्याच्या कक्षेत येणार वक्फ बोर्ड
वक्फ विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. विधेयक फक्त संपत्तीशी संबंधित आहे. धार्मिक संस्थांनांशी या विधेयकाचा काहीच संबंध नाही. आता वक्फ बोर्ड सुद्धा कायद्याच्याक कक्षेत येईल. आता विरोधकांकडूव विनाकारण दिशाभूल करण्याचे प्रकार सुरू आहेत असे मंत्री रिजिजू म्हणाले.
याआधी कोणत्याही विधेयकावर लोकांच्या इतक्या याचिका कधीच आल्या नव्हत्या जितक्या वक्फ विधेयकावर आल्या आहेत. 284 डेलिगेशनने विविध समित्यांसमोर आपले म्हणणे मांडले. 25 राज्यांच्या वक्फ बोर्डांनीही आपली भूमिका मांडली. पॉलिसी मेकर्स आणि तज्ज्ञ लोकांनीही त्यांचे म्हणणे मांडले. आता या बिलाचा विरोध करणारे सुद्धा सकारात्मक दृष्टीकोनातून बिलाचे समर्थन करतील अशी अपेक्षा मंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली.
जगात सर्वाधिक वक्फ संपत्ती भारतात
जगात सर्वाधिक वक्फ संपत्ती भारतात आहे. तरी देखील मुस्लीम लोक गरीब का आहेत? गरीब मुस्लिमांसाठी वक्फ संपत्तीचा उपयोग का केला गेला नाही. काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशतील मुस्लिमांना फक्त व्होटबँक बनवून ठेवले आहे. आजमितीस देशात 8.72 लाख वक्फ संपत्ती आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत दिली.
Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकात आहे तरी काय? कुणाचा फायदा, कुणाचं नुकसान? जाणून घ्या, डिटेल..
वक्फ विधेयकाचं नाव उम्मीद
या नव्या वक्फ विधेयकाचं नाव उम्मीद (UMEED) झाले आहे. या संशोधित विधेयकाच्या माध्यमातून एक नवीन पहाट येईल. देशातील कोट्यावधी मु्स्लिमांना याचा फायदा होणार आहे. या विधेयकाचे मुस्लिमांनीही स्वागत केले आहे. बोर्डाच्या ऑडीटचीही तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. या विधेयकानंतर वक्फ बोर्डाकडे नेमकी किती संपत्ती आहे याची माहिती समोर येईल असेही मंत्री रिजिजू यांनी सांगितले.