West Bengal Result : 4 मई ‘दीदी’ गई! बंगालमध्ये बॅनर्जींची ‘ममता’ कमी करणारे शाहंचे 4 ‘धुरंधर’
'दीदीं'च्या गडाला खिंडार पाडल्यानंतर आता बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Amit Shah 4 Member Team Played Crucial Role To Defeating Mamata Banerjee In WB : पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात आज 4 मे 2026 रोजी अभूतपूर्व उलथापालथ पाहायला मिळत आहे. गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला यंदा भारतीय जनता पक्षाने जोरदार हादरा दिला असून, राज्यात पहिल्यांदाच ‘कमळ’ फुलताना दिसत आहे. ममता दीदींच्या या अभेद्य गडाला सुरुंग लावून बंगालमध्ये भगवी लाट निर्माण करणाऱ्या अमित शहांच्या कोअर टीममधील 4 ‘धुरंधर’ नेत्यांची ही विशेष गोष्ट.
ममतांना टक्कर देणारे सुवेंदू अधिकारी की आरएसएसमधून आलेले घोष; कोण चालवणार बंगालची गादी?
सध्याच्या कलानुसार, भाजपने 194 जागांवर आघाडी घेत 148 हा बहुमताचा आकडा सहज पार केला आहे, तर तृणमूल काँग्रेस केवळ 94 जागांवर मर्यादित राहिली असून, बंगालमध्ये सत्ता स्थापनेसाठी 148 जागांचा जादुई आकडा गाठणे आवश्यक असून भाजपने तो सहज पार केला आहे.
गेल्या निवडणुकीत भाजपने 77 जागा जिंकल्या होत्या, तर तृणमूलने 215 जागा मिळवून दणदणीत विजय मिळवला होता. मात्र, यंदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तब्बल 15 दिवस बंगालमध्ये तळ ठोकून संपूर्ण टीम कामाला लावली होती. ममता दीदींच्या या अभेद्य गडाला सुरुंग लावण्यात शहांच्या कोअर टीममधील 4 चेहऱ्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता.
बंगालमध्ये दीदींचा गड पाडणारे भाजपचे 4 धुरंदर कोण?
1. दिलीप घोष : संघटनात्मक बांधणीचा कणा : आरएसएसची पार्श्वभूमी असलेल्या दिलीप घोष यांनी बंगालमध्ये भाजपची पाळेमुळे घट्ट रोवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अमित शहांच्या कोअर ग्रुपचा भाग असलेल्या घोष यांचा प्रभाव राज्यातील 77 जागांवर दिसून आला. खडगपूरमधून निवडणूक लढवणारे घोष आगामी भाजप सरकारमध्ये मोठ्या भूमिकेत दिसू शकतात.
2. ममता दीदींना त्यांच्याच बालेकिल्ल्यात रोखणारे सुवेंदु अधिकारी : विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना थेट टक्कर दिली. ममतांचा बालेकिल्ला असलेल्या भवानीपूरमधून निवडणूक लढवून त्यांनी दीदींना स्वतःच्याच मतदारसंघात गुंतवून ठेवले. यामुळे ममता बॅनर्जींना राज्याच्या इतर भागात जास्त वेळ देता आला नाही. सध्या सुवेंदु अधिकारी हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत.
थलपतीच्या घरी जल्लोष, निकालापूर्वीच ‘विजयी भव:’ ची भविष्यवाणी करणारे ज्योतिषी ‘राधन पंडित’ कोण?
3. रणनीती आणि समन्वयाचे मास्टरमाइंड सुकांत मजुमदार : केंद्रात मंत्री राहिलेले सुकांत मजुमदार यांनी प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य, सुवेंदु अधिकारी आणि दिलीप घोष यांच्याशी उत्तम समन्वय साधला. अमित शहांच्या कोअर टीमचे सदस्य म्हणून त्यांनी संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक प्रचाराची संपूर्ण धुरा यशस्वीपणे सांभाळली.
4. शहांचे ‘ट्रम्प कार्ड’ सुनील बन्सल : उत्तर प्रदेशातील भाजपच्या यशाचे शिल्पकार राहिलेले सुनील बन्सल बंगालमध्ये भाजपसाठी गेमचेंजर ठरले. प्रभारी म्हणून त्यांनी अमित शहांची रणनीती प्रत्यक्षात उतरवली. ‘डर भगाओ, भरोसा जगाओ’ यांसारख्या घोषणांमधून त्यांनी मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला आणि छोट्या जनसभांच्या माध्यमातून भाजपसाठी अनुकूल वातावरण तयार केले.
‘नान उंगल वेत्तू पिल्लैयागा इंगे निकिरेन’ याच शब्दांनी विजय तामिळनाडूतील निवडणुकांमध्ये बनला ‘थलपती’
‘सोनार बांगला’च्या दिशेने भाजपचं नव पर्व
पश्चिम बंगालमधील ही आकडेवारी केवळ सत्तांतराचे संकेत देत नाही, तर बंगालच्या राजकीय संस्कृतीत झालेल्या मोठ्या बदलाची साक्ष देत आहे. ममता बॅनर्जी यांची 15 वर्षांची एकहाती सत्ता उलथवून लावणे हे भाजपसाठी सोपे नव्हते, मात्र अमित शहांची रणनीती आणि त्यांच्या या चार ‘धुरंदरांनी’ जमिनीवर केलेले काम अखेर यशस्वी ठरले आहे.
‘दीदीं’च्या गडाला खिंडार पाडल्यानंतर आता बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सुवेंदु अधिकारी यांचे नाव शर्यतीत आघाडीवर असले, तरी दिलीप घोष आणि सुकांत मजुमदार यांची भूमिकाही सरकारमध्ये महत्त्वाची असणार आहे. एकूणच, 4 मे 2026 हा दिवस बंगालमध्ये ‘सोनार बांगला’च्या दिशेने भाजपच्या एका नव्या पर्वाची सुरुवात करणारा ठरला आहे.