Explainer : GMT नव्हे MST ठरवणार जगाची वेळ?; प्रधानांनी मांडलेला ‘महाकाल स्टँडर्ड टाइम’ प्रस्ताव काय?
Mahakal Standard Time जागतिक वेळ GMT ठरवली जाते, जी लंडनमधून जाणारी एक रेषा आहे.ही रेषा प्राइम मेरिडियन (Prime Meridian) म्हणूनही ओळखली जाते.
What Is Mahakal Standard Time : भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मांडलेली एक नवी संकल्पना सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे. जगाची वेळ ठरवणाऱ्या सध्याच्या ‘ग्रीनविच मीन टाइम’ला (GMT) बदलून त्याऐवजी ‘महाकाल स्टँडर्ड टाइम’ (MST) लागू करावा, असा प्रस्ताव प्रधान यांनी मांडला आहे. यासाठी त्यांनी युक्तिवाद करत सांगितले की, येत्या काही दिवसांत प्राइम मेरिडियन महाकाल प्रमाणवेळेशी संरेखित केला जाईल. पण हा ‘महाकाल स्टँडर्ड टाइम’ नेमका काय आहे? आणि ब्रिटीशकालीन GMT बदलणे खरोखर शक्य आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया…
मोठा दिलासा! आता छोट्या चुकांसाठी जेल नाही; मोदी सरकारचा नवा ‘जन विश्वास’ कायदा, काय बदलणार?
प्रधान नेमकं काय म्हणाले?
आंतरराष्ट्रीय ‘महाकाल’ परिषदेत बोलताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काळाच्या गणनेवरून एक महत्त्वाचे भाष्य केले. ते म्हणाले की, वेळेची अचूक गणना करणे हा भारताचा प्राचीन वारसा आणि शोध आहे, जो वसाहतवादी राज्यकर्त्यांनी ‘ग्रीनविच स्टँडर्ड टाइम’च्या (GMT) नावाखाली आपल्याकडून हिरावून घेतला. जगाची वेळ ठरवण्याचे मूळ केंद्र हे युरोप नसून मध्य भारतातील उज्जैन, अवंतिका किंवा डोंगला हे भूखंड असल्याचा दावादेखील त्यांनी यावेळी केला. विशेष म्हणजे, आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा संदर्भ देत सांगितले की, मी दोन-तीन एआय टूल्सना विचारले की, विषुववृत्त आणि कर्कवृत्त उज्जैनमध्ये मिळतात का? त्यावर उज्जैनमध्ये नाही, पण ते आजूबाजूच्या परिसरात मिळतात असे आले.
जगाच्या वेळेचं गणित जिथून ठरतं ते ग्रीनविच मीन टाइम’ (GMT) काय?
जागतिक वेळ ग्रीनविच मीन टाइमनुसार (GMT) ठरवली जाते, जी लंडनमधून जाणारी एक रेषा आहे. ही रेषा प्राइम मेरिडियन (Prime Meridian) म्हणूनही ओळखली जाते. आपल्या सर्वांना माहित आहे की, सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. त्यामुळे, पूर्व आणि पश्चिम यांच्यातील अंतर मोजण्यासाठी पृथ्वीभोवती एक बिंदू निश्चित करण्यात आला, जो GMT म्हणून ओळखला जातो. 1850 आणि 1860 च्या दशकात, ब्रिटनमधील व्यापार झपाट्याने वाढला, ज्यामुळे औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. मालाच्या वाहतुकीसाठी रेल्वेचे जाळे उभारले गेले, ज्यासाठी अचूक वेळेची नोंद ठेवणे आवश्यक होते. यामुळे रेल्वेच्या वाहतुकीसाठी टाईम झोनची निर्मिती झाली. हळूहळू, आसपासच्या देशांनी हे टाईम झोन स्वीकारायला सुरुवात केली. अखेरीस, 13 ऑक्टोबर 1884 रोजी संपूर्ण जगाने जीएमटीला वेळेचे प्रमाण म्हणून स्वीकारले. तेव्हापासून संपूर्ण जगाच्या घड्याळांची वेळ मिळवली जाते.
ट्रम्प यांच्या धमकीचा ‘बाजार’ उठला, इराणप्रमाणेच भारतीय शेअर मार्केटनेही धाक झुगारला; पहा चाल
GMT खरंच बदलता येऊ शकते का?
जगाची प्रमाणवेळ ठरवणारा केंद्रबिंदू हा केवळ ब्रिटनमध्येच असावा, असे कोणतेही बंधनकारक भौगोलिक नियम नाहीत. पृथ्वीच्या गोलाकार आकारामुळे पूर्व आणि पश्चिम भागांमधील अंतर मोजण्यासाठी लागणारी ‘शून्य रेखा’ (Zero Meridian) भारत किंवा जगातील कोणत्याही अन्य देशातून निवडणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे. विशेष म्हणजे, जेव्हा 1884 मध्ये ‘ग्रीनविच मीन टाइम’ची (GMT) सुरुवात झाली, तेव्हा अनेक देशांनी त्याला सुरुवातीला मान्यता देण्यास नकार दिला होता. त्या काळी अनेक राष्ट्रं स्वतःच्या राजधानीतून जाणाऱ्या मध्यान्ह रेषेलाच ‘प्रधान रेखा’ मानून आपली वेळ ठरवत असत. त्यामुळे, जागतिक सहमती मिळाल्यास GMT बदलून तो ‘महाकाल स्टँडर्ड टाइम’ किंवा अन्य कोणत्याही केंद्रबिंदूवर नेणे ही केवळ अशक्य गोष्ट नाही, तर तो एका ऐतिहासिक बदलाचा भाग ठरू शकते.
1984 मध्ये जागतिक प्रमाणवेळेचा ऐतिहासिक निर्णय कसा झाला?
1984 मध्ये, तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चेस्टर ॲलन आर्थर यांनी जगभरातील राष्ट्रांची एक शिखर परिषद बोलावली, ज्यात एक समान मानक रेखांश निवडण्याचे मान्य करण्यात आले. इंग्लंडमधील ग्रीनविच येथील रॉयल वेधशाळेतून जाणारा रेखांश मानक रेखांश म्हणून निवडण्यात आला. तेव्हापासून आजतागायत याच रेषेवरून संपूर्ण जगाची वेळ निश्चित केली जाते.
ग्रीनविचची निवड का करण्यात आली?
आता प्रश्न असा निर्माण होतो की, ‘प्राईम मेरीडियन’ (शून्य रेखांश) म्हणून लंडनच्या ग्रीनविचलाच का निवडण्यात आले? याचे मुख्य कारण म्हणजे, इसवी सन 1675 मध्ये ब्रिटनच्या राजाने लंडनच्या ग्रीनविच येथे एक वेधशाळा (Observatory) स्थापन केली होती. समुद्रात प्रवास करणाऱ्या जहाजांना अचूक दिशा आणि मार्ग शोधता यावा, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. वेळेचे सर्वात पहिले आणि शास्त्रशुद्ध निर्धारण याच ठिकाणाहून करण्यात आले होते आणि अनेक प्रयोगांती ते अचूक असल्याचे सिद्ध झाले होते. याच ऐतिहासिक आणि तांत्रिक अचूकतेमुळे, जगाची प्रमाणवेळ ठरवण्यासाठी ग्रीनविचलाच ‘मुख्य केंद्रबिंदू’ मानले गेले.
22 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली! आता बदलता येणार तुमचा Gmail ID; सुंदर पिचाईंची मोठी घोषणा
उज्जैनला मध्यवर्ती रेखावृत्त केव्हा मानले गेले?
जागतिक स्तरावर उज्जैनला कधीही ‘केंद्रीय मेरीडियन’ म्हणून मान्यता मिळाली नसली, तरी 1884 पूर्वी भारतात उज्जैनलाच वेळेचा केंद्रबिंदू मानले जात असे. आजही हिंदू पंचांग, तिथी आणि कुंडलीची गणना याच ऐतिहासिक आधारावर केली जाते, ज्याला ज्योतिष विज्ञानात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, सध्याची भारताची अधिकृत प्रमाणवेळ (IST) ही प्रयागराजजवळी मिर्झापूर येथून मोजली जाते. ही व्यवस्था ब्रिटिशांनी 1906 मध्ये लागू केली होती.
प्राइम मेरीडियन बदलण्यातील आव्हानं
जरी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘प्राइम मेरीडियन’ बदलून ‘महाकाल स्टँडर्ड टाइम’ करण्याची संकल्पना मांडली असली, तरी प्रत्यक्षात हे बदल घडवून आणणे अत्यंत गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक आहे. अशा प्रकारच्या बदलासाठी केवळ भारताचा निर्णय पुरेसा नसून, जगातील बहुतांश देशांची राजकीय आणि वैज्ञानिक सहमती मिळवणे अनिवार्य असेल. कारण अचानक प्रमाणवेळ बदलल्यास जागतिक स्तरावर चालणारी विमान वाहतूक, समुद्री जहाजांचे मार्ग (Navigation), आंतरराष्ट्रीय व्यापार आणि बँकिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर्समध्ये मोठी विसंगती निर्माण होऊ शकते. एवढेच नव्हे तर, सध्याचे सर्व आधुनिक तंत्रज्ञान आणि सॅटेलाइट सिस्टीम ही GMT च्या आधारावर चालते. त्यामुळे हा पाया बदलल्यास जागतिक डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये मोठी अव्यवस्था निर्माण होऊ शकते, त्यामुळे हा बदल करणे एक प्रकारे प्रचंड मोठा ‘लॉजिस्टिक’ आणि ‘टेक्निकल’ टास्क आहे.