Year Ender 2023 : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारत, क्रिकेटमध्येही अव्वल; जगभरात भारताचा डंका
Year Ender 2023 : 23 ऑगस्ट 2023 हा दिवस भारतीयाला विसरताच येणार नाही. कारण याच (Year Ender 2023) दिवशी जगात कोणत्याच देशाने केली नाही अशी उत्तुंग कामगिरी करून दाखवली. याच दिवशी संध्याकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून भारताने इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश होण्याचा मान भारताने मिळवला. सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर चांद्रयान 3 ने (Chandrayaan 3) एक मेसेज पाठवला. “मी माझ्या मुक्कामी पोहोचलो आणि तुम्ही सुद्धा” 2023 या वर्षात भारताच्या नावावर असे अनेक विक्रम नोंदवले गेले ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमानच वाटेल. 2023 या वर्षाला निरोप देताना पुन्हा एकदा या ऐतिहासिक कामगिरीवर नजर टाकू या..
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारत
14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 लाँच करण्यात आले. यानंतर पुढील 40 दिवसात 21 वेळा पृथ्वी आणि 120 वेळा चंद्राला चक्कर मारून त्याला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करायचे होते. याच दरम्यान 10 ऑगस्ट रोजी रशियाने लूना 25 मिशन (Luna 25) लाँच केले. या यानाने कमी वेळात चंद्रावर पोहोचण्यासाठी सरळ मार्ग निवडला. त्यामुळे भारताच्या चांद्रयानाच्या आधी लुना 25 पोहोचण्याची शक्यता होती. पण नशिबाने साथ दिली नाही. चंद्राच्या मार्गावर असतानाच 19 ऑगस्ट रोजी लुना अचानक क्रॅश झाले आणि चंद्रावर पोहोचण्याचे रशियाचे स्वप्न भंगले. अमेरिका आणि युरोपीय युनियन यांच्यानंतर ही कामगिरी करणारा भारत हा जगातील तिसरा देश बनला आहे. दुसरीकडे चांद्रयान आपल्या पद्धतीने मार्गक्रमण करत राहिले आणि 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले सुद्धा.
सूर्याकडे झेपावलं आदित्य एल 1
चंद्राच्या यशस्वी मोहिमेनंतर भारताने आपला मोर्चा थेट सूर्याकडे वळवला. 2 सप्टेंबर 2023 सकाळी 11.50 वाजता इस्रोने आदित्य एल 1 मिशन (Aditya L1 Mission) लाँच केले. 125 दिवसाचा प्रवास करून 6 जानेवारी 2024 रोजी हे यान एल 1 या पॉइंटवर पोहोचेल. सूर्याच्या दिशेने यान पाठवणे ही तशी अवघड कामगिरी परंतु भारताने ही कामगिरी करून दाखवली.
रिफाइंड पेट्रोलियम विक्रीत सौदीला पछाडले
सन 1954 साली भारताने रशियाच्या मदतीने पहिली रिफायनरी सुरू केली होती. येथे कच्च्या तेलातून पेट्रोल आणि डिझेल तयार करण्यास सुरुवात केली. आता 2023 मध्ये भारत हा अमेरिकेनंतर पेट्रोलियम पदार्थांची विक्री करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. यासाठी भारताने मोठ्या प्रमाणात रशियाकडून क्रूड तेल खरेदी केले होते.
क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट मध्ये नंबर वन
23 सप्टेंबर 2023 मध्ये मोहाली येथे भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना सुरू होता. 49 व्या ओवरच्या चौथ्या बॉलवर षटकार खेचत केएल राहुलने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर भारताने टेस्ट, वनडे आणि कसोटी या तिन्ही प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला.
महिलांना 33 टक्के आरक्षण
6 डिसेंबर 1946 रोजी अस्तित्वात आलेल्या संविधान सभेच्या एकूण 389 सदस्यांपैकी फक्त 15 महिला सदस्य होत्या. यानंतर 29 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सहीनंतर नारी शक्ती वंदन कायदा अस्तित्वात आला. या निर्णयामुळे संसद आणि विधिमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण मिळेल.
सुरत डायमंड बोर्स, सर्वात मोठे ऑफिस
सन 1900 मधील पाटीदार समाजातील गांधा भाई आणि रंगील दास दक्षिण आफ्रिकेवरून परतले आणि येथे त्यांनी हिरे कटिंग आणि पोलिशिंग व्यवसाय सुरू केला. आता 2023 मध्ये जगातील 80 टक्क्यांपेक्षा जास्त हिर्यांची कटिंग आणि पोलिशिंचे काम भारतात होते. 17 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी हिरे व्यापाऱ्यांसाठी जगातील सर्वात मोठ्या कार्यालयाचे उद्घाटन केले. ज्याचे नाव सुरत डायमंड बोर्स आहे.
भारतात जी 20 बनले जी 21
9 सप्टेंबर 2023 रोजी भारतात जी 20 परिषदेची बैठक सुरू होती. या बैठकीत पीएम मोदी यांनी आफ्रिकी युनियनला जी 20 मध्ये सहभागी करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर विदेश मंत्री एस जयशंकर यांनी आफ्रिकी युनियनचे चेअरपर्सन अजाली औसमानी यांना घेऊन पुढील सीटपर्यंत पोहोचले. येथे औसमानी यांनी मोदींची गळाभेट घेतली आणि आपल्या खुर्चीवर जाऊन बसले. यानंतर 20 सदस्य असलेले जी 20 जी 21 बनले.
‘नाटू नाटू’ गाण्याचा ऑस्करमध्ये डंका
मार्च 2023 मध्ये 95 व्य ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात भारताने पहिल्यांदाच दोन अवॉर्ड जिंकले. बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म प्रकारात द एलिफेंट व्हीस्परर्सला पहिला आणि बेस्ट ओरिजिनल साँग प्रकारात नाटू नाटू गाण्याला दुसरा पुरस्कार मिळाला. हे गाणं युक्रेनच्या राष्ट्रपती भवनाच्या बाहेर शूट केले गेले होते