एल्विश यादव हाजीर हो! पोलिसांनी धाडली नोटीस, अटकेची टांगती तलवार

एल्विश यादव हाजीर हो! पोलिसांनी धाडली नोटीस, अटकेची टांगती तलवार

नवी दिल्ली : यूट्यूबर आणि बिग बॉस विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) याला दिल्ली पोलिसांनी चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. नशेसाठी सापाच्या विषाचा पुरवठा केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी ही नोटीस बजावली आहे. यावेळी याप्रकरणातील अटक आरोपी राहुल आणि एल्विश यादव यांना समोरा-समोर बसवून पोलीस चौकशी होण्याची शक्यता आहे. (YouTuber and Bigg Boss winner Elvis Yadav has been issued a notice by the Delhi Police to appear for questioning)

भाजप  (BJP) खासदार मेनका गांधी यांच्या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या तक्रारीनंतर यूट्यूबर आणि बिग बॉस विजेता एल्विश यादव याच्यावर दिल्लीतल पबमध्ये नशेसाठी सापाच्या विषाचा पुरवठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यात काही आरोपींना पोलिसांनी अटकही केले आहे. त्यानंतर आता एल्विश यादव यालाही चौकशीसाठी नोटीस बजाविण्यात आली आहे. यात आता चौकशी दरम्यान, पोलिसांना एल्विशचा सहभाग आढळल्यास त्याला अटक होण्याचीही शक्यता आहे.

बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा थेट 75 टक्क्यांवर; नितीशकुमार यांचा आणखी एक मास्टरस्ट्रोक

एल्विश यादवने संबंध नाकारला :

दरम्यान, या प्रकरणाशी आपला कसलाही संबंध नाही, असे एल्विश यादवने म्हंटले आहे. एका व्लॉगमध्ये तो म्हणाला, या प्रकरणात जेव्हा पोलिस तपास सुरू करतील, तेव्हा मी एक मुख्य व्हिडिओ देखील शेअर करेन. मी तुम्हाला सर्व काही दाखवीन. लवकरच एक प्रेस स्टेटमेंट देखील जारी केले जाईल. या प्रकरणात माझा कोणताही सहभाग नसल्याचे मी मोठ्या आत्मविश्वासाने सांगत आहे.

मनेका गांधी म्हणत होत्या की मी माझ्या गळ्यात साप घालून फिरतो. पण ते सर्व गाण्याच्या शूटिंगसाठी होते आणि दुसरे काही नाही. या सर्व बेकायदेशीर कामांमध्ये अडकून मी माझे आणि माझ्या कुटुंबाचे नाव खराब करणार नाही. या प्रकरणात माझा एक टक्काही सहभाग असेल तर मी आत्मसमर्पण करेन, मग यात शिक्षा 10 वर्षे असो वा 100 वर्षे. .” “प्रत्येकाला माहित आहे की माझा दर्जा इतका कमी झाला नाही की मी अशा प्रकारची गोष्ट करू शकेन.” असेही एल्विश पुढे म्हणाला.

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय : ऐन दिवाळीत फटाक्यांवर बंदी; महाराष्ट्रात काय होणार?

मनेका गांधींवर मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा :

एल्विश यादवयाने त्याच्या प्रतिमेला धक्का पोहचविल्याचा आरोप करत खासदार मेनका गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. मनेका गांधींनी मला सापाच्या विषाच्या पुरवठादारांचे प्रमुख म्हटले आहे. यावरुन मी त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करणार आहे. मी त्यांना सोडणार नाही. आता मी या सर्व गोष्टींबाबत सक्रिय झालो आहे. आधी मला वाटायचे की माझा वेळ वाया घालवू नये, पण आता माझ्या प्रतिमेवर परिणाम होत आहे, असे त्याने म्हंटले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube