ठाकरे फक्त संभ्रम तयार करतात, त्यांच्या आरोपात तथ्य नाही; सत्तारांनी घेतला जोरदार समाचार
Abdul Sattar : विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल (Shiv Sena MLA disqualification result) दिला. हा निकाल शिंदे गटाच्या बाजून लागला. मात्र, या निकालावर शिवेसेनेचे दोन्ही गट नाराज आहेत. या निर्णयाविरोधात शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खुली पत्रकार परिषद घेऊन अनेक धक्कादायक दावे केले. हा निर्णय एकतर्फी देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) संभ्रम तयार करत आहेत, असं सत्तार म्हणाले.
आज माध्यमांशी संवाद साधतांना अब्दुल सत्तारांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपाविषयी विचारले असता सत्तार म्हणाले की, उद्धव ठाकरे हे संभ्रम तयार करत आहेत. ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना रिक्षावाला म्हणून डिवचलं. पण, शिंदेंच्या रिक्षात पन्नास आमदार जातात, हे काही सोपी गोष्ट नाही. आता मिलिंद देवरा यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावरून मुख्यमंत्री शिंदेंवर लोकांची विश्वसार्हता आहे. शिवाय, निवडणूक आयोगानेही चिन्ह आणि पक्ष दोन्ही शिंदेंना दिलं. विधानसभा अध्यक्षांनीही खरी शिवसेना शिंदेंचीच असल्याचं स्पष्ट केलं. हे उद्धव ठाकरेंचं दुखणं आहे. अध्यक्षांनी ज्या उणावी दाखवल्या, त्याला बगल देण्याच प्रयत्न ठाकरे गट करत आहे. आणि लोकांमध्ये संभ्रम तयार करताहेत. नार्वेकरांनी संवैधानिक अधिकार आहेत .संविधानाच्या चौकटीत राहून त्यांनी निकाल दिला. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या आरोपात तथ्य नाही, असं सत्तार म्हणाले.
Pune Lok Sabha : रविंद्र धंगेकरांची दिल्लीवारी : काँग्रेसमध्ये चलबिचल, भाजपमध्ये चिंता
ठाकरे आता सर्वोच्च न्यायालयात गेले. मात्र न्यायालय आम्हाला न्याय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजही पक्षप्रमुख म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री आणि आम्ही दैवत मानतो, असंही सत्तार म्हणाले.
न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन बाबासाहेब आंबेडकरांनी ८० टक्के समाजावर अन्याय केला, असं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. त्यावरही सत्तारांनी भाष्य केलं. आव्हाड मनाला वाटेल ते बोलतात, त्यांच्यावर आपण काय बोलणार. ते प्रभू श्रीरामांविषयी देखील वक्तव्य करतात. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय दिला. ८० टक्के लोकांना न्याय मिळाला नाही, त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो. आव्हाडांना हात जोडून विनंती आहे की, त्यांनी असा वक्तव्य करून वातावरण खराब करू नये, असं म्हणत त्यांचा बोलविता धनी दुसार कोणी तरी असू शकताो, असंही सत्तार म्हणाले.