महायुतीत ट्विस्ट! अजितदादांना दिल्लीतून गुडन्यूज; विश्वासू नेत्याला केंद्रात मोठी जबाबदारी

महायुतीत ट्विस्ट! अजितदादांना दिल्लीतून गुडन्यूज; विश्वासू नेत्याला केंद्रात मोठी जबाबदारी

Sunil Tatkare : राज्यात विधानसभा निवडणुकीचे रण तापू (Maharashtra Elections) लागले आहे. राज्यात महायुतीचं सरकार आहे. निवडणुकीतही महायुती एकत्रित लढणार असल्याचे दावे केले जात आहे. या महायुतीत अजित पवारांचा गट (Ajit Pawar) आहे. या गटामुळेच लोकसभेत भाजपाचं नुकसान झाल्याची चर्चा आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडूनही राष्ट्रवादीविरोधात वक्तव्ये दिली जात आहेत. त्यांच्या वक्तव्यावर खुद्द अजित पवारांनीच नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) महायुतीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. या घडामोडी राज्यात घडत असताना दिल्लीतून मात्र राष्ट्रवादीसाठी गुडन्यूज आली आहे.

अजित पवार यांचे विश्वासू सहकारी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीच्या चेअरमनपदी सुनील तटकरे यांची वर्णी लागली आहे. केंद्राच्या या समितीत एकूण 31 सदस्य आहेत. यामध्ये लोकसभेचे 21 तर राज्यसभेचे 10 सदस्य असतात. पेट्रोल किंवा नॅचरल गॅसशी संबंधित एखादा विषय सभागृहात चर्चेला येणार असेल तर संबंधित समिती या विषयाची तपासणी करते. यानंतर सभागृहाला अहवाल सादर करण्याची जबाबदारी या समितीची असते.

Sunil Tatkare : पृथ्वीराज चव्हाणांना ‘राष्ट्रवादी’ विरोधाची ‘सुपारी’ सरकार पाडल्याच्या टीकेवर तटकरे भडकले

या समितीत सुनील तटकरे यांची वर्णी लागली आहे. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ही घटना महत्वाची आहे. शिवाय सुनील तटकरे यांचे राजकीय वजनही वाढणार आहे. राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीकडून 70 ते 80 जागांची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच महायुतीतून बाहेर पडणार अशाही चर्चा ऐकू येत आहेत.

त्यात ही बातमी आल्याने मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली. फक्त एकच खासदार निवडून आणता आला. त्यांना महायुतीत घेतल्याने भाजपला फटका बसला असे भाजप नेत्यांचे मत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचा गट महायुतीत नको असे काही भाजप नेत्यांना वाटत आहे.

त्यामुळे भविष्यात जर अजित पवारांनी महायुतीतून (Mahayuti) बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाच तर सुनील तटकरे यांना मिळालेली ही जबाबदारी कायम राहणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Ajit Pawar: ..आता विधानसभेला दादांना पाडायचंय का?, गब्बरच्या ‘त्या’ पत्रामुळे बारामतीत खळबळ

follow us
  • fb
  • instagram
  • youtube