वळसे पाटलांची नार्को टेस्ट करा, मग कळेल…; अजितदादा नेमकं असं का म्हणाले?

वळसे पाटलांची नार्को टेस्ट करा, मग कळेल…; अजितदादा नेमकं असं का म्हणाले?

Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections) प्रचार सध्या जोरात सुरू आहे. राजकीय नेते प्रचारात व्यस्त दिसत आहेत. मात्र, दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) प्रचारात दिसले नाहीत. निवडणुकीत ते पूर्णपणे अलिप्त आहेत. वळसे पाटील दुखापतग्रस्त झाल्यानं अजित पवार गटालाही धक्का बसला आहे. दरम्यान, दिलीप वळसे पाटील हे केवळ शरीराने अजित पवारांसोबत (Ajit Pawar)आहेत, अशी टीका विरोधकांनी केली. त्यावर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

T20 World Cup 2024: भारीच, फ्रीमध्ये पाहता येणार टी20 वर्ल्ड कप सामने; जाणून घ्या कसं 

शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हे रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव-पाटील लढत आहेत. आज शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासाठी अजित पवार यांची आंबेगाव, घोडेगाव येथे सभा झाली. या सभेतनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना दिलीप वळसे पाटील यांच्यावर झालेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले की, दिलीप वळसे हे शरीराने आणि मनाने कुठं आहेत, हे सर्वांना कळावं, यासाठी आपण त्यांची नार्को टेस्ट करूया, मग कळेल ते शरीराने आणि मनाने कुठं आहेत, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

”मी राज ठाकरे नाही; मेलो तरी चालेल पण कमळ, हात आणि धनुष्यबाणावर लढणार नाही” 

गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या कोणत्याही सभेत दिसले नाहीत. त्यामुळं भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. याविषयी अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले की, छगन भुजबळ यांची मध्यंतरी प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे ते कोणत्याही प्रचार सभेत नव्हते. तब्येत चांगली असेल तर बाकीच्या गोष्टी असतात…. सर्व जागां निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे अजित पवार म्हणाले.

संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतरावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. न्याय व्यवस्थेने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून तो निर्णय अंतिम मानायचा असतो, असं अजित पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube