Ajit Pawar : कंत्राटी भरतीचा निर्णय योग्यच होता पण.. अजितदादांकडूनही विरोधक टार्गेट

Ajit Pawar : कंत्राटी भरतीचा निर्णय योग्यच होता पण.. अजितदादांकडूनही विरोधक टार्गेट

Ajit Pawar : राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयावर विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यानंतर काल अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर याचे खापर फोडले. त्यांच्याच काळात कंत्राटी भरतीचे निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे पाप आमच्या माथी नको असे म्हणत त्यांनी हे निर्णय रद्द केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. यानंतर विरोधी पक्षांनीही त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. विरोधकांमुळेच सरकारला जीआर रद्द करणे भाग पडले अशा प्रतिक्रिया विरोधी पक्षातील नेत्यांनी दिल्या. या सगळ्या घडामोडींनंतर आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोर्चा सांभाळला आहे. या मुद्द्यावर त्यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे.

‘मविआ’चं पाप आमच्या माथी नको, उबाठा सरकारचे कंत्राटी भरतीचे ‘जीआर’ रद्द; फडणवीसांची मोठी घोषणा

देवेंद्र फडणवीस यांनी सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यांनी दाखले देखील दिले आहेत. पहिला, दुसरा निर्णय कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाला याबद्दल त्यांनी माहिती दिली. त्यावेळेस याचा इतका प्रोपगेंडा करण्यात आला नव्हता. आता मात्र विरोधकांनी जाणीवपूर्वक खूप मोठा प्रोपगेंडा केला आहे. अजित पवार वडगाव शेरीत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयावरही त्यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले.

आपल्या सरकारच्या काळात दीड लाख नोकर भरतीचा निर्णय घेण्यात आला. याआधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोकर भरती कोणत्याच सरकराच्या काळात झाली नव्हती. वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर कुणी कुणाची माफी मागायची हे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे, असा टोला अजितदादांनी विरोधकांना लगावला. कंत्राटी भरतीचा निर्णय योग्यच होता पण विरोधकांकडून विनाकारण गैरसमज पसरवण्यात आला.

काँग्रेसने कंत्राटी भरती केली नाही, अपयश झाकण्यासाठी आमच्यावर खापर…; अशोक चव्हाणांचे टीकास्त्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी असणाऱ्या सरकारमध्ये सर्वात जास्त नोकरभरती, दीड लाख मुलामुलींची नोकरभरती करण्यात आली. मी अनेकांच्या मंत्रिमंडळात किंवा उपमुख्यमंत्री म्हणून मी काम केलं आहे. पण त्यावेळीही कधी इतक्या मोठ्या प्रमाणात भरती झाली नव्हती असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

कंत्राटी भरतीचं पाप काँग्रेस अन् राष्ट्रवादीचं 

कंत्राटी भरतीचं पाप १०० टक्के काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आहे. त्यांच्या पापाचं ओझं आपण का उचलायचं असे मी अजित पवार यांनाही सांगितलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने काढलेला कंत्राटी भरतीचा जीआर आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे फडणवीस म्हणाले. कंत्राटी भरतीचे जीआर महाविकास आघाडी सरकारनेच काढले होते. त्यांच्याकडूनच राज्यातील युवकांची दिशाभूल करण्यात आली, असा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube