शिंदे, अजितदादा अन् मित्र पक्षांना 138 मध्येच गुंडाळणार? भाजपचा जागा वाटपाचा फॉर्म्युला रेडी!

शिंदे, अजितदादा अन् मित्र पक्षांना 138 मध्येच गुंडाळणार? भाजपचा जागा वाटपाचा फॉर्म्युला रेडी!

मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) जागा वाटप हा कळीचा मुद्दा बनला होता. महायुतीत जागा वाटप लवकर न झाल्याने प्रचाराला फारसा वेळ मिळाला नाही. त्याचवेळी महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) जागा वाटप लवकर करुन प्रचारात किमान दीड महिन्यांची आघाडी घेतली होती. त्याचा फायदा त्यांना झाला, असा दावा महायुतीच्या उमेदवारांनी केला होता. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या नेत्यांनी हाच मुद्दा आता लवकरात लवकर मार्गी लावण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी युद्ध पातळीवर बैठकांचे सत्र सुरु आहे.

भाजपच्या प्रदेश सुकाणू समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव आणि संघटनमंत्री शिवप्रकाश असे नेते उपस्थित होते. सुमारे पाच तास चाललेल्या या बैठकीत जवळपास 205 जागांचे वाटप मार्गी लागले आहे. तर केवळ 83 जागांवरील वाटप होणे बाकी आहे. त्यामुळे महायुतीने कंबर कसून तयारू सुरु केली आहे हे नक्की.

पाहूयात नेमके कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात…

महायुतीतील सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष आहेत. याशिवाय आरपीआय (आठवले गट), प्रहार, रासप, जनसुराज्य, मनसे आणि 14 अपक्षांचाही छोट्या पक्षांना पाठिंबा आहे. 2019 मध्ये भाजपचे 105 आमदार निवडून आले होते. तर बंडावेळी शिंदेंसोबत 40, अजितदादांसोबत 41 आमदार होते. मिळालेल्या माहितीनुसार, यातील काही जागांवरील अदलाबदल वगळता शक्यतो विद्यमान आमदार असलेली जागा त्या-त्या पक्षांकडेच राहणार आहेत. शिवाय महायुतीतील अपक्ष आणि छोट्या पक्षांनाही त्यांच्या जागा त्यांनाच देण्यात येणार आहेत. हे सूत्र ठरवूनच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जागावाटपाची चर्चा सुरु केली आहे.

धोतर घातलेल्या शेतकऱ्याला हाकलून देणे नडले ! सरकारच्या दणकाने जीटी वर्ल्ड मॉल बंद

या सूत्रानुसार, 205 जागांचे वाटप मार्गी लागल्याचे दिसून येते. आता केवळ 83 जागांचे वाटप होणार आहे. यातही भाजपने कोणत्याही परिस्थितीत 150 हून अधिक जागा लढविण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे 83 पैकी 45 ते 50 जागा भाजपच घेऊ शकते. उरलेल्या 43 जागांमध्येच शिंदे, अजितदादांना अधिकच्या जागा दिल्या जातील. त्यामुळे शिंदे आणि अजितदादा या दोघांच्याही वाट्याला प्रत्येकी 55 ते 60 एवढ्याच जागा येऊ शकतात. तर आरपीआयला (आठवले गट) तीन ते चार, रासप, प्रहार आणि जनसुराज्य या पक्षांना त्यांच्या जागा सोडून आणखी एखादी-दुसरी जागा जास्तीची मिळण्याची शक्यता आहे.

जागा वाटपात आणखी एक मुद्दा महत्वाचा ठरतो तो म्हणजे जागांची अदलाबदल. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात पुरेसे मताधिक्य मिळालेले नाही, विधानसभा मतदारसंघात महायुतीला मिळालेली मते आणि चांगला उमेदवार तिघांपैकी कोणत्या पक्षाकडे आहे या सुत्रांवर जागांची अदलाबदल होऊ शकते. तिथल्या आमदारांबद्दल नाराजी असले किंवा सर्वेक्षणातून काही नकारात्मक मुद्दे पुढे येत असतील तरीही जागांची अदलाबदल केली जाऊ शकते.

हरियाणा विधानसभा निवडणूक; सुनीता केजरीवालांकडून मोठ्या घोषणा, ‘या’ पाच योजनांचं हमीपत्रं जारी

जागावाटपाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातच चर्चा सुरू असली तरी महायुतीतील पक्षांचे काही नेते त्यावर जाहीर वक्तव्ये करीत आहेत, हा मुद्दाही या बैठकीत प्रमाख्याने उपस्थित झाला. अजित पवार यांच्याशी युती केल्याने भाजप नेते आणि कार्यकर्ते नाराज आहेत, याबाबत रा. स्व. संघ विचारांशी जवळीक असलेल्या ‘साप्ताहिक विवेक’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामुळे जनता व कार्यकर्त्यांमध्ये गेलेला संदेश व होत असलेली चर्चा आदी मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube