ठाकरे बंधूंचा आदर्श… तुतारी गटानेही अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र यावं; अमोल मिटकरी काय म्हणाले?

Amol Mitkari On Ajit Pawar And Sharad Pawar : सध्या महाराष्ट्रभर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळं या चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, यावर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलीय. ठाकरे बंधूंचा आदर्श घेऊन तुतारी गटानेही अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र यावं, असं सूचक वक्तव्य अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) केलंय.
खळबळजनक! कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांचा मृत्यू, पत्नीनेच खून केल्याचा संशय
या अनुषंगाने माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, ठाकरे बंधू एकत्र येणार, या चर्चा सध्या सर्व सोशल मीडियावर जोर धरून आहेत. जर ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल, तर निश्चितच स्वागत केलं पाहिजे. काहीही म्हटलं तरी, राज ठाकरेंचा पक्ष उबाठा पक्षापेक्षा लहानच (Maharashtra Politics) आहे. लहानांनी मोठ्यांकडे जाणं हे कधीही महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरूनच आहे. काल हे एकत्र येत असताना तुतारी गटाच्या (Sharad Pawar) एAmol Mitkari On Ajiका आमदाराने ट्विट केलं होतं अन् सांगितलं होतं की, पक्ष एकत्र आले पाहिजे. मी या निर्णयाचं स्वागतच करतो.
एक वाटी आमरस अन् मोदक खाण्यासाठी दीड कोटी, शेतकऱ्यांना 1 रूपयाही नाही; राजू शेट्टी आक्रमक
अजितदादांच्या (Ajit Pawar) छत्रछायेखाली जर तुतारी गट असाच एकत्र येण्याचा विचार करीत असेल तर भविष्यात नक्कीच विचार केलं जाईल, असं देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांची झालेली आहे. शिव, फुले, शाहु, आंबेडकरांची झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा आणखीन भक्कम होण्याकरिता, जर तुतारी गटाला असं वाटत असेल पुढची वाटचाल करावी, तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा ठरवतील.
पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बेरजेचं समीकरण करणं, बेरजेचं राजकारण करणं, हे माझं कर्तव्य आहे. असं मला वाटतं. त्यामुळे नाही कोणाकडून तर निदान राज ठाकरेंकडून तरी तुतारी गटाने हा आदर्श घ्यायला काही हरकत नाही, असं राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.