Video : आनंद आश्रमात उधळल्या नोटा, केदार दिघे संतापले, म्हणाले, ‘दिघे साहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य…’

  • Written By: Published:
Video : आनंद आश्रमात उधळल्या नोटा, केदार दिघे संतापले, म्हणाले, ‘दिघे साहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य…’

Anand Ashram News : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आनंद आश्रमात (Anand Ashram) कार्यकर्त्यांना नोटा उधळल्याचा प्रकार समोर आला. गणपती विसर्जनादरम्यान, आनंदा आश्रमात कार्यकर्त्यांनी ढोलताशांवर नोटा उधळल्या. आनंदा आश्रमातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे (Kedar Dighe) यांनी प्रतिक्रिया दिली.

महायुतीला विदर्भात मोठा फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्व्हेने वाढवली डोकेदुखी 

केदार दिघे यांनी हा व्हिडिओ ट्विट केला. ट्विटमध्ये केदार दिघे यांनी म्हटलं की, तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या. दिघे साहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले. आमचा आनंद हरपला!”

तर माध्यमांशी बोलतांना दिघे म्हणाले की, आनंद आश्रमातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर मला ठाण्यातून अनेकांचे फोन येत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकाना अत्यंत दुःख झालं. ही ठाणे जिल्ह्याची आणि ठाणेकरांची शोकांतिका आहे. दिघे साहेबांच्या आनंद आश्रमात अशी घटना घडणे दुर्दैवी आहे, असं ते म्हणाले.

WHO कडून Mpox लसीला मान्यता, लसीकरणाची ‘या’ देशात होणार सुरुवात 

जर मानधन द्यायचे असते तर ते वेगळ्या पद्धतीने देता आलं असतं. अशा पद्धतीने आनंद दिघेंच्या प्रतिमेसमोर नोटा उधळण्याची ही कोणती पद्धत आहे, असा सवालही केदार दिघेंनी केला.

ते म्हणाले, मी याआधीही सांगितलं होतं की, आनंद आश्रम आता आनंद आश्रम राहिलेलं नाही. कारण ज्या माणसाला आपण पूजतो, ज्याला आपण दैवत मानतो त्यांच्या प्रतिमेच्या समोर हे कार्यकर्ते चपला घालून नाचत आहोत, ज्या पद्धतीने नोटा उडवल्या जात आहेत, ही आपली संस्कृती नाही, अशा पद्धतीचे संस्कार आम्हाला दिघे साहेबांनी दिले नाहीत, असं ते म्हणाले.

विधानसभेत शिवसेनेला फटका बसणार?

संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आगामी काळात शिवसेनेला याचा फटका बसू शकतो. विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. विशेष म्हणजे, आनंद मठ हे अनेकांच श्रद्धास्थान आहे. असं असतांना मठात नोटा उधळण्याचा प्रकार समोर आल्यानं त्याचा फटका शिवसेनेला निवडणुकीत बसू शकतो.

दरम्यान, अद्याप यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली नाही. ते काय प्रतिक्रिया देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube