Anil Parab : न्यायालयाच्या निर्णयानुसार व्हिपचं उल्लंघन केल्याने आमदार अपात्र ठरणार
Anil Parab Maharashtra Political Crises : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शनिशिंगणापूर व शिर्डी या ठिकाणी ते येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यासंदर्भात शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून सर्वत्र स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. स्वागताची जोरदार तयारी सर्वत्र पाहायला मिळत आहे. या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
>आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर विधानसभा अध्यक्षांचे मोठं वक्तव्य
या दौऱ्यावर जाण्या आधी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अनिल परबांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचून दाखवला. तेव्हा त्यांनी पंतप्रधान मोदींवर देखील ताशेरे ओढले आहेत. परब म्हणाले न्यायालायाने जो निर्णय दिला त्यावर दावे-प्रतिदावे सुरू झाले. मात्र निकालामध्ये काही कारण सांगण्यात आले आहेत त्यानुसार हे सरकार घटनाबाह्य आहे. न्यायालयाने व्हिप कुणाचा असावा यावर न्यायालायाने स्पष्ट सांगितले की तो राजकीय पक्षाचा म्हणजे शिवसेनेचा असतो आणि व्हिपचं उल्लंघन केल्यास आमदार अपात्र होतात. असं अनिल परब यांनी सांगितलं.
त्यामुळे व्हिपचं उल्लंघन केल्याने शिंदेंचे आमदार अपात्र ठरणार आहेत. तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे जाणार आहे. त्यामुले आता ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिणार आहे. असं सांगितलं. तर विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिल्यास आम्ही त्या विरोधीत कोर्टात जाऊ असा इशारा देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.