आमदार अपात्र ठरणारच; शिंदे गटाच्या शेंड्या भाजपच्या हातात, परबांचा शिंदे गटावर निशाणा

आमदार अपात्र ठरणारच; शिंदे गटाच्या शेंड्या भाजपच्या हातात, परबांचा शिंदे गटावर निशाणा

Anil Parab : महाराष्ट्र सत्तासंघर्षावर घटनापीठाने एका महिन्यापूर्वी निकाल दिला होता. त्यात सत्ताबदलाच्या काळात घेतलेल्या विविध निर्णयांवर कोर्टाने आपली निरीक्षणे नोंदवली होती. राज्यपालांचे(Governor)सर्व निर्णय चुकीचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले होतं. त्याचवेळी न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सभापती राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे पाठवून त्यावर लवकर निर्णय घ्यावा, असेही कोर्टाने सांगितलं. मात्र,अद्याप यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. शिंदे गटाच्या सगळ्या शेंड्या या भाजपच्या (BJP) हातात आहेत, असं परब म्हणाले.(Anil Parab targets eknath Shinde’s MLA, they said shinde group hold BJP)

आवाज कुणाचा, पॉडकास्ट शिवसेनेचा या कार्यक्रमात बोलतांना अनिल परब यांनी शिंदे गटावर टीका केली. ते म्हणाले की, कोर्टाने आपल्या सुनावणीत भरत गोगावलेंची प्रतोदपदाची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली. गोगावले यांना शिवसेना पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याचा सभापतींचा निर्णय बेकायदेशीर असल्याचे कोर्टानं म्हटलं. आणि सुनिल प्रभूंना वैध ठरवलं आहे. मात्र, शिंदेसोंबत गेलेल्या आमदारांनी प्रभू यांचा व्हिप मान्य केला नाही. त्यामुळं हे आमदार अपात्र होतील, असं परब म्हणाले.

डोनाल्ड ट्रंप यांच्यावर चालणार आणखी एक खटला; गोपनीय कागदपत्र जवळ ठेवल्याचा आरोप

परब म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय कोर्टाने सभापतींकडे सोपवला. आमदारांच्या अपात्रतेबाबत रिझनेबल वेळेत निर्णय घ्यावा, असं कोर्टानं सांगितलं. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी अद्याप निर्णय घेतला नाही. कारण, त्यांना सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या चौकटीत निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि तो निर्णय आमच्या बाजूने द्यावा लागणार आहे. आणि तसं झालं तर सरकार कोसळू शकतं. आणि भाजपला ते नको आहे. त्यामुळं अपात्रतेचा निर्णय झाला नाही. शिंदे गटाच्या सगळ्या शेंड्या ह्या भाजपच्या हातात आहेत. भाजपने उठ म्हटलं की, उठायचं अन् ते बस म्हणाले की बसायचं, अशी अवस्था शिंदे गटाची आहे, असा टोलाही परब यांनी लगावला.

परब यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला देत सांगितले की, कोर्टाची सुनावणी पाहता कोर्टाने, निवडणुक आयोग, राज्यपाल यांच्यावर ताशेरे ओढले. राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळं शिंदे गटाच्या 16 आमदारांना आणि उर्वरित 34 आमदारांना अपात्र करण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने आखलेल्या चौकटीत राहूनच आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय द्यावा लागेल, नाहीतर पुन्हा सुप्रीम कोर्टात जावं लागणार आहे. असा इशाराही परब यांनी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube