अजितदादांचा काकांना जळगावात आणखी एक धक्का? मंत्री महाजनांना जेरीस आणणारे नावही पक्षप्रवेशाच्या यादीत

Another blow to Ajit Pawar to uncle Sharad Pawar in Jalgon : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( Ncp) दोन्ही गट एकत्र येतील, असे राजकीय पतंग उडविले जात आहेत. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची वेगळीच मोहीम सुरू आहे. ती मोहीम म्हणजे पक्षात इनकमिंग करून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकण्यासाठी पक्ष मजबूत करणे. गेल्या आठवड्यात जळगावमधील अनेक स्थानिक नेते राष्ट्रवादीत आले. त्यात दोन माजी मंत्री, दोन आमदार आहेत. अजितदादा एेवढावरच थांबलेले नाहीत. आता दुसऱ्या टप्प्यातही शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांवर अजितदादांनी जाळे टाकले आहे. अजितदादांबरोबर जाणारे ते नेते कोण आहेत ? खडसे हे अजितदादांकडे येतील का ? इनकमिंगचा जळगावमध्ये (jalgaon) अजितदादांना फायदा होईल का ? अजितदादा ताकद वाढवत असताना भाजप, सेनेचे नेते नाराज आहेत का ? हे पाहुया…
गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चार मोठे प्रवेश झाले. माजी मंत्री सतीश पाटील, माजी मंत्री जळगाव ग्रामीणचे गुलाबराव देवकर, चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील (चोपडा), विधानपरिषदेचे माजी सदस्य दिलीप सोनवणे हे प्रवेश झाले होते. हे सर्वजण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत होते. जळगावमधील घरकुल घोटाळ्यात गुलाबराव देवकरांचा शिक्षा झालेली होती. अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना शरद पवारांनी देवकरांना विधानसभेला तिकीट दिले होते. त्यानंतही देवकरांनी शरद पवार यांची साथ सोडली आहे.
GST विभागाकडे असलेली करदात्याची गोपनीय माहितीची होतेय गळती, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
देवकरांना अजितदादांनी बरोबर घेतल्याने महायुतीकडे टीका होऊ लागली. पाणीपुरवठा मंत्री व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व गुलाबराव देवकर हे कट्टर राजकीय विरोधक आहे. या प्रवेशानंतर गुलाबराव पाटील यांनी देवकर यांच्यासह थेट अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. आमची इच्छा नसतानाही अजित पवार यांनी त्या सर्वांना पक्षात घेतले आहेत. अजित पवार यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
अमेरिका आणि चीन यांच्यातील Tariff War संपले, कुणी घेतली माघार?
या पक्ष प्रवेशामुळे महायुतीतील नेते नाराज असताना अजित पवार यांनी आता पक्ष प्रवेशाचा दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू केली आहे. येत्या 14 मे रोजी याबाबत अंतिम निर्णय होणार आहेत. परंतु राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांचे नावे हे डोळे विस्फारणारी आहेत. एकनाथ खडसे यांच्यासह रोहिणी खडसे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, उद्योजक श्रीराम पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांची नावे चर्चेत आहे. नाव चर्तेत येताच एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका मांडलीय. मी शरद पवारांबरोबरच आहे. परंतु इतर कोणी अजित पवारांबरोबर जाणार आहेत की नाही याबाबत सांगू शकत नाही, असे खडसे यांनी म्हटले आहे.
दिलीप खोडपे हे पूर्वीचे भाजपचे आहेत. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांना शरद पवार गटाकडून माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात विधानसभेला तिकीट देण्यात आले होते. खोडपे यांनी एक लाख मते घेऊन महाजन यांना घाम फोडला होता. त्यांचा नंबर पक्ष प्रवेशात आहे तर श्रीराम पाटील हे रक्षा खडसे यांच्याविरोधात शरद पवार गटाचे उमेदवार होते. त्यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा आहे. शरद पवार गटाचे महिला प्रदेशाध्यक्ष व एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांचेही नाव चर्चेत आले आहे. परंतु त्याचे खंडण केलेले नाही.
जळगावमध्ये अजितदादांची ताकद म्हणावी तशी नाही. माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील हेच जळगावमधील अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजितदादांचे इनकमिंग मोहिम सुरू आहे. जळगाव महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकामध्ये आपली ताकद वाढविण्यासाठी, पक्षविस्तारासाठी अजितदादांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु त्यातून महायुतीमध्ये खटके उडू शकतात. कारण गुलाबराव पाटील, गिरीश महाजन या दोन मंत्र्यांच्या मतदारसंघात अजितदादा ताकद लावत आहेत. जळगावमध्ये एेवढे ताकद लावून अजितदादा हे स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढू शकतात, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.