जामखेड बाजार समितीत रोहित पवारांची डोकेदुखी वाढली

  • Written By: Published:
जामखेड बाजार समितीत रोहित पवारांची डोकेदुखी वाढली

अहमदनगरः जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात कर्जत-जामखेड बाजार समितीची निवडणूक मात्र चुरशीची असणार आहे. येथे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कर्जत बाजार समितीसाठी दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत असल्याचे चित्र आहे. पण जामखेडमध्ये मात्र तीन पॅनल निवडणुकीची रिंगणात उतरणार आहे. तिसरा पॅनल पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या एका नेत्याचा आहे. त्याची डोकेदुखी आमदार रोहित पवारांना होण्याची शक्यता आहे.

पुण्यात 12 एप्रिलला ‘रोजगार मेळावा’; दरमहा दुसऱ्या बुधवारी आयोजन

कर्जत-जामखेड मतदारसंघ राम शिंदे यांच्याकडून रोहित पवार यांनी हिसकावून घेतल्यानंतर पहिल्यांदा बाजार समितीच्या निवडणुका होत आहे. त्यामुळे दोघांमध्ये बाजार समित्याच्या निवडणुकीत जोरदार राजकीय संघर्ष पाहिला मिळाला आहे. दोघांनी मतदारसंघात काही दिवसांपूर्वी मोठे कार्यक्रम घेतले आहे. शिंदेंसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी मेळावा घेतला होता. त्यानंतर रोहित पवार यांनीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थित एक कार्यक्रम घेतला होता.

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिंदे व पवार यांच्या पॅनलमध्ये थेट लढत होणार आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी तब्बल 196 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. त्यात पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले भास्करराव मोरे यांनीही पॅनल तयार केले आहे. त्यामुळे शिंदे, पवार आणि मोरे असे तिघांचे पॅनल या निवडणुकीत दिसणार आहे.


आदित्य ठाकरे ठाण्यातला कोणता मतदारसंघ निवडणार?

मोरे यांनी पॅनल तयार करणे हे आमदार रोहित पवार यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. अर्ज मागे घेण्यासाठी चौदा दिवसांची मुदत आहे. त्यामुळे येत्या 20 एप्रिलनंतर येथील चित्र स्पष्ट होणार आहे. येत्या काळात येथील नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे या दोघांसाठी बाजार समितीची निवडणूक महत्त्वाची आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीमुळे इच्छुकांची गर्दी
बाजार समितीसाठी सर्वत्रच जास्त अर्ज दाखल होत आहे. कर्जत-जामखेडमध्ये जास्त अर्ज दाखल झाले त्याचे कारण आगामी निवडणुका आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायतीसाठी तिकीट मिळविण्यासाठी काही जण राजकीय खेळी करत आहेत. बाजार समिती निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पुढील तिकीट मिळविण्यासाठी हे सुरू असल्याचे राजकीय चर्चा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube