‘आम्हीच सरकार स्थापन करणार अन् मुख्यमंत्रीही आमचाच’, बच्चू कडूंनी सांगितलं सत्तास्थापनेचं गणित…
Bachchu Kadu : विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) नुकतीच पार पडली आहे. काल मतदान प्रक्रिया संपल्यावर एक्झिट पोल (Exit polls) जाहीर करण्यात आले. बहुतांश एक्झिट पोल्समध्ये महायुती (Mahayuti) वरचढ दिसत आहे. तर, काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र, आता प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मोठा दावा केला. आमचं सरकार बनणार, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
शिंदे गट अन् शरद पवार गट एकत्र येणार? शिरसाट म्हणाले, शिंदे साहेब नेहमीच..
आम्हीच सरकार स्थापन करणार
बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. एक्झिट पोल काही खरे नसतात
असं म्हणत कुणाचीही सत्ता येईल, अशी आकडेवारी जुळत नाही. त्यामुळे आम्हीच सरकार स्थापन करणार आहोत. हे सूर्यप्रकाशाइतकेच सत्य आहे. बाकीच्यांना आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल. आमच्या प्रहारचे किमान 10 आमदार निवडून येतील. महाशक्ती परिवर्तन आघाडी मिळून 15 आमदार होतील. त्यासोबतच अनेक अपक्ष आमदारांच्याही आम्ही संपर्कात आहोत. त्यामुळे आमच्याशिवाय कोणाचेही सरकार स्थापन होऊ शकत नाही असा दावा कडूंनी केला.
Gautam Adani Fraud : यूएस न्याय विभागाने केलेले लाचखोरीचे आरोप अदानी समुहाने फेटाळले
मुख्यमंत्री आमचाच
कोणाचा पाठिंबा घ्यायचा ते आम्ही ठरवू. आम्ही मोठ्या पक्षाचा पाठिंबा घेऊ, लहान पक्ष आणि अपक्ष सरकारमध्ये असतील. मुख्यमंत्री आमचाच असेल, असा विश्वासही कडूंनी व्यक्त केला.
यावेळी कडूंनी भापज आणि कॉंग्रेसवरही टीका केली. भाजपने आमच्या मतदारसंघात खूप ताकद लावली, अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. पण, ते शेवटपर्यंत संभ्रमात राहिले. सुरुवातीला काँग्रेस भाजपसोबत होती, नंतर भाजपा काँग्रेसचं समर्थन करत होती. कारण दोन्ही पक्षांचे उद्दीष्ट एकच होतं, ते म्हणजे बच्चू कडूला पाडणं. त्या दोन्ही पक्षांचे उमेदवार स्वत: निवडून येण्याऐवजी मला पाडून टाकण्याचा विचार करत होते. जिंकण्यापेक्षा मला पाडणं ही त्यांची त्यांची प्राथमिकता होती. मात्र, मी सर्वांना सांगू इच्छितो की आमचा विजय पक्का आहे, असं कडू म्हणाले.