निवडणूक आयोगावर राजकीय दवाब असल्याने असा निर्णय, बाळासाहेब थोरांतांची टीका

  • Written By: Published:
निवडणूक आयोगावर राजकीय दवाब असल्याने असा निर्णय, बाळासाहेब थोरांतांची टीका

अहमदनगर : निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघालं आहे. कारण, आज शिवसेना (Shiv Sena हे चिन्ह आणि नाव उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून घेत ते एकनाथ शिंदे आणि गटाकडे सोपवण्यात आलं आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली.

थोरात म्हणाले, निवडणूक आयोगावर राजकीय दवाब असल्याने त्यांनी शिंदे गटाला धनुष्यबाण दिलं. मात्र, शिवसेना आणि ठाकरे हे कधी वेगळे होऊ शकत नाहीत.

थोरात म्हणाले, महाराष्ट्रातील जनता काय दुधखुळी नाही. जनतेला राजकारण चांगले समजते. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून तिची पातळी सुद्धा खालावली आहे. या संस्थेवर राजकारणाचा दबाव असून त्यातूनच हा राजकीय निर्णय आहे, अशी टीका थोरात यांनी केली.

Uddhav Thackeray यांना निवडणूक आयोगासमोरही एका खासदारने गंडवले….

ते म्हणाले, जो निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. तो लोकशाहीला घातक असा आहे. शिवसेना ठाकरे यांच्यापासून वेगळी काढूच शकत नाही. ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण आहे. ही संघटना वाढवण्यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य घातले आहे. त्यामुळे जनता जो निर्णय देईल तो उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच निर्णय देईल, असा विश्वास थोरांनी व्यक्त केला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube