‘बारामतीत अजितदादाच’च्या घोषणा देत अडवला ताफा; अजितदादांनीही दिला शब्द…
Ajit Pawar News : अजित पवार (Ajit Pawar) बारामतीतून निवडणूक लढवणार नसल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अजित पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर करताच बारामतीकरांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतल्याचं दिसून आलंय. तर दुसरीकडे बारामतीमध्ये अजित पवारच उमेदवार हवे असल्याच्या घोषणा देत बारामतीकरांनी थेट अजित पवारांचा ताफा अडवलायं. यावेळी बारामतीकरांनी एकाच सुरात बारामतीतून अजितदादाच अशा घोषणा तर हातात अजित पवारांचे पोस्टर झळकावल्याचं दिसून आलंय. बारामतीकरांनी ताफा अडवून मागणी केल्यानंतर तुमच्या मनातलाच उमेदवार बारामतीत देणार असल्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलायं.
गुजराती ठगाने गुजरात अन् देशात भिंत बांधलीयं; उद्धव ठाकरेंकडून अमित शाहांची पोलखोल
राज्यात जुलै 2023 मध्ये लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या होत्या. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर अजित पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान, बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उभे करणे ही चूक असल्याचं मान्य केलं होतं. तसेच बारामतीतून निवडणूक लढवणार नसल्याचंही अजितदादांनी सांगितलं होतं. त्यानंतर अजित पवार बारामतीत निवडणूक लढवणार नसल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
Aap : काँग्रेसचा बदला घेण्यासाठी ‘इंडिया’शी गद्दारी; स्वाती मालीवालने आपच्या जखमेवर मीठ चोळलं
अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी चर्चेला पुर्णविराम देऊन टाकलायं. अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहेत. मी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा करीत आहे. यामध्ये कुठलाही संभ्रम ठेऊ नका, मी ही जागा अधिकृतपणे घोषित करीत आहे. बारामतीत दुसरं तिसरं कोणीही उभं राहणार नाही. अजित पवारचं बारामतीचे उमेदवार राहणार असल्याचं पटेल यांनी यावेळी स्पष्ट केलंय.