‘शरद पवारांनी डबल गेम खेळला पण; त्यांचा आजही फोन येतो’
Devendra Fadanvis On Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 साली आमच्याशी डबल गेम खेळला, असा खळबळजनक दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावेळी ते रिपब्लीक भारत या वृत्त वाहिनीशी बोलत होते. त्यांनी या मुलाखतीमध्ये अनेके धक्कादायक खुलासे केले. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ” 2019 च्या विधानसभा निवडणुक निकालानंतर उद्धव ठाकरे आमचा फोन घेत नव्हते. तेव्हा आम्ही दुसरा पर्याय शोधायला सुरुवात केली. तेव्हा शरद पवार यांच्यासोबत आमची बैठकी झाली होती. त्याबैठकीमध्ये महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रवादी सरकार बनविणार याचा निर्णय झाला. अजित पवार आणि मी आम्ही दोघे मिळून हे सरकार बनवू याचा निर्णय झाला. सर्व अधिकार आम्हाला दोघांना देण्यात आले. एवढी सगळी तयारी झाल्यावर एका वेळेवर शरद पवार यातून बाजूला झाले. त्यावेळी अजित पवारांना माझ्यासोबत येण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. कारण आम्ही सरकार स्थापन करण्याची सर्व तयारी केली होती. अजित पवार जर सोबत आले नसते तर ते एक्सपोज झाले असते”, असे फडणवीस म्हणाले.
शरद पवारांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा
तसेच त्यावेळी सरकार स्थापन करण्याची सुरुवात शरद पवार यांच्याशी बोलणी करुनच झाली होती. शरद पवारांनी आमचा उपयोग करुन स्ट्रटेजी केली आणि आमचा वापर करुन निघून गेले. त्यावेळी शरद पवारांनी आमच्याशी डबल गेम खेळला, असा खळबळजनक दावा फडणवीसांनी केला आहे.
पंढरपुरात विठू नामाचा गजर! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली आषाढीची शासकीय महापूजा
यावेळी त्यांना अजित पवार यांच्याशी तुमचे बोलणे सुरु आहे का असे विचारण्यता आले. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिले आहे. अजित पवार विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्याशी आमचे बोलणे होतच असते. तसेच कालच माझे शरद पवार यांच्याशे बोलणे झाले. त्याआधीदेखील माझे त्यांच्याशी बोलणे झाले. आमच्यामध्ये संवाद होत असतो. शरद पवारांनी मला स्वत: फोन केला होता. आम्ही जवळपास 10 मिनीट बोलत होतो. महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षातीन नेत्यांचा एकमेकांशी संवाद होत असतो, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.