मोठी बातमी! भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी

  • Written By: Published:
मोठी बातमी! भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी

Shweta Mahale : दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरु आहे. तर दुसरीकडे आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.  या बातमीनुसार,  चिखलीच्या भाजप (BJP) आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांना जीवे मारण्याची धमकीचे पत्र मिळाले आहे.

श्वेता महाले या प्रकरणात आज दुपारी चिखली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवणार आहे. श्वेता महाले यांची आमदारकीची ही दुसरी टर्म आहे. जिल्हा परिषदेपासून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली आहे.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांच्या कारला बॉम्बने उडवण्याची धमकी अज्ञात व्यक्तीनं मेलद्वारे दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आहे. माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणात बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथून दोन आरोपींना  ताब्यात घेतले आहे.

पुण्यात चाललंय तरी काय? केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणाला मारहाण, तिघांना अटक 

एकनाथ शिंदे यांच्या कारला बॉम्बने उडवून देण्याऱ्या धमकीचा ई-मेल गोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीनं पाठवला होता. मुंबईतील जवळपास 7-8  पोलीस ठाण्यात आणि इतर विभागात हा मेल पाठवण्यात आला होता. यानंतर मेल कोणी पाठवला याचा शोध मुंबई पोलिसांकडून घेण्यात येत होता.  आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना  आरोपी बुलढाण्यात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

महिलांना 50 टक्के सवलत अन् ज्येष्ठांना मोफत बस सेवा दिल्याने ST तोट्यात, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची कबुली

follow us
  • fb
  • instagram
  • youtube