भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम कुणी केला ? आ. धसांनी थेट फडणवीसांचचं नाव घेतलं
Suresh Dhas on Chhagan bhujbal : मागील काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेत असलेले भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी आता (Suresh Dhas) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. आमदार धस यांनी लेट्सअप मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत छगन भुजबळांचा (Chhagan Bhujbal) करेक्ट कार्यक्रम कुणी केला याचं थेट उत्तर दिलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. तसेच 2009 मध्ये आमच्या सर्वांचा उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांना पाठिंबा असताना अचानक छगन भुजबळ यांचं नाव कसं पुढे आलं याचाही किस्सा सांगितला.
धस पुढे म्हणाले, छगन भुजबळ आणि माझं कधीच पटलेलं नाही. भुजबळ मनात फार राग धरणारे व्यक्ती आहेत. एका निवडणुकीत त्यांनी मला मदत सुद्धा केली होती. आम्ही 2009 मध्ये निवडून आलो होतो. पवार साहेब आणि त्यांची वादावादी सुरू होती की उपमुख्यमंत्री कुणाला करायचं. त्यावेळी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करा अशी सर्वांची भावना होती. पण शरद पवार भुजबळ यांच्यासाठी आग्रही होते. शेवटी पवार साहेबांनी तेच केलं. अजितदादांनी काही उपमुख्यमंत्री केलं नाही.
Santosh Deshmukh Murder : ‘आरोपींचे कुणीशीही लागेबांधे असले तरी…’; DCM शिंदेंचा थेट इशारा
फडणवीसांनीच केला करेक्ट कार्यक्रम
आता मंत्री अतुल सावे साहेबांचे जे चेंबर आहे तेथे आधी डावखरे साहेबांचे चेंबर होते. वसंतराव डावखरेंच्या तिथं एक सह्यांची मोहीम घ्या असे म्हटले गेले. आमचे राष्ट्रवादीचे त्यावेळी 69 सीट निवडून आले होते. आणि दोन ते अपक्ष आमच्या बाजूने होते. सगळ्यांचा आग्रह असा होता की मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा करावा. अजितदादांना मुखमंत्री करा असा आमचा आग्रह होता. 2009 मध्ये अजितदादांना उपमुख्यमंत्री करा असं आमच्या सगळ्यांचं मत होत. पण कुणीतरी एक कागद आणला नाव लिहून सह्या करायला सांगितल्या. कागद घेतला आणि पहिल्या नंबरला माझचं नाव लिहिलं.
अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करावं असं त्यात होतं आणि मागे त्यांचा पुतण्या आणि मुलगा हे सर्व पाहत होते. त्यामुळे माझी मोठी कोंडी झाली. पुढे सार्वजनिक बांधकाम खाते भुजबळ साहेबांकडे गेले. मग काय 2009 ते 2014 या पाच वर्षांच्या काळात एक रुपयाचाही निधी माझ्या मतदारसंघांत दिला नाही. म्हणजेच भुजबळ साहेब माणसं डोक्यात ठेवणारे आहेत. पण ज्यावेळी भुजबळ साहेब तुरुंगात गेले त्यावेळी त्यांना भेटायला मीच गेलो होतो. म्हटलं कसं काय चाललयं.. मी मुद्दाम त्यांना भेटायला गेलो होतो. कारण त्यांचा चांगलाच कार्यक्रम झाला होता आणि तोही देवेंद्र फडणवीस यांनी केला होता, असा गौप्यस्फोट सुरेश धस यांनी केला.
एकही आरोपी सुटता कामा नये, दयामाया दाखवू नका; CM फडणवीसांचा अधिकाऱ्यांना फोन