महाजनांना उमेदवारी दिल्यास काय करणार? रक्षा खडसेंनी स्पष्टच सांगितलं
Raksha Khadse : गिरीश महाजन (Girish Mahajan) आमचे नेतेच, पक्षाने उमेदवारी दिल्यास आनंदाने निवडून आणणार असल्याचं मोठं विधान भाजपच्या रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसेंनी (Raksha Khadse) सांगितलं आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर मतदारसंघासाठी मंत्री गिरीश महाजनांच्या नावाची चर्चा होऊ घातली आहे. रक्षा खडसे रावेर मतदारसंघातून सलग दोनवेळा खासदार राहिल्या आहेत. त्यावरच बोलताना रक्षा खडसेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राम मंदिर निमंत्रणाचे राजकारण करु नका, शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना सल्ला
रक्षा खडसे म्हणाल्या, मंत्री गिरीश महाजन आमचे नेते आहेत, आगामी लोकसभा निवडणूकीत पक्षाने आदेश दिला तर आम्ही सर्व कार्यकर्ते, जनता आनंदाने त्यांचं काम करुन त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देणार असल्याचं रक्षा खडसेंनी स्पष्ट केलं आहे.
Bhima Koregaon case : नजरकैदेत असलेल्या गौतम नवलखा यांची दिल्ली पोलिसांकडून पुन्हा चौकशी
महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, त्यानूसार त्याचं जागावाटप होणार आहे. भाजपकडूनही मतदारसंघात मोर्चेबांधणी असून आम्ही देखील काम करीत आहोत. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्रच असून आव्हान कोणाचंही असलं तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला मान्यता मिळाली आहे, देशातील ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास पंतप्रधान मोदींसोबतच आहे.. त्यामुळे 2024 साली पंतप्रधान नरेंद्र मोदीच शपथ घेणार असल्याचा विश्वास खडसेंनी व्यक्त केला आहे.
भारताला पुन्हा धक्का : कतारमधील नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना तीन ते 25 वर्षांचा तुरुंगवास?
एकनाथ खडसेंकडूनही मोर्चेबांधणी :
रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून रावेरची जागा लढण्याबाबत मी सुद्धा इच्छुक आहे. रावेरची जागा मिळाली तर माझ्याच नावाचा प्राधान्याने विचार करावा, अशी विनंती मी पक्षाला केली आहे. पक्षानेही मला रावेर लढण्याबाबत याआधीच एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं आहे.
विजयकांतच्या अंत्यदर्शन घ्यायला गेलेल्या थलपथी विजयला चाहत्याने भिरकावली चप्पल
दरम्यान, मागील दोन टर्मपासून मी नेतृत्व करीत आहे, आगामी निवडणूकीत पक्षाने संधी दिली तर सलग तिसऱ्यांदा मी उमेदवार असेल. पाचही वर्ष आमची तयारी असतेच, शेवटी पक्षच निर्णय घेईल, व्यक्तिगत माझा कोणी विरोधक नाही, नवीन वर्ष विरोधकांचं भावी आयुष्य सुखसमृद्धीचं गेलं पाहिजे, असंही त्या म्हणाल्या आहेत.