‘लोकसभेसाठी भाजपची घरोघरी प्रवासाची योजना’; बावनकुळेंनी सांगितला प्लॅन
Chandrashekhar Bawankule : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रत्येक मतदारसंघात चाचपणी सुरु झाली आहे. अशातच आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा काय प्लॅन असणार? याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) प्लॅनच सांगितला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजपच्या 7 महत्त्वाच्या आघाड्या असून यासंदर्भातील बैठक झाली आहे. आगामी लोकसभेसाठी प्रत्येक घरी प्रवास करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. गरीब कल्याणासाठी मोदी सरकारनं जी कामं केलीत ही कामं पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे. घरापर्यंत योजना मिळाल्यात त्या सुरळीत आहेत की नाही? हे तपासणार नसेल तर मिळवून देणार आहोत. मकर संक्रांतीसाठी विकासाचं वाण देणार असल्याचंही बावनकुळे म्हणाले आहेत.
अवघ्या काही तासांत ठरणार राज्याच्या राजकारणाचं भविष्य; 10 जानेवारीला नार्वेकरांचा निकाल
काळाराम मंदिरात दर्शनासाठी जाणार…
नाशिकमध्ये उद्या भाजपची बैठक पार पडणार असून बैठकीआधी काळाराम मंदिरात आरती आणि दर्शन घेणार आहे. अयोध्येला जाण्याआधी काळाराम मंदिराचं दर्शन करणार असून राज्यातील रामाची अनेक मंदिरं आहेत. यामध्ये काळाराम मंदिर देखील एक आहे आणि पूजा केली पाहिजे म्हणून जातोय ही राजकीय गोष्टीसाठी नाही, दर्शनासाठी जात असल्याचं ते म्हणाले आहेत.
भापचे १४ जानेवारीपासून मेळावे सुरु होणार असून आमचा विचार महायुती मजबूत करणे आहे. सर्वच पक्षाची मतं कसं मिळतील असा महायुतीचं प्रयत्न असून मोदींच्या नेतृत्वात आम्ही पुन्हा निवडून येणार असल्याचा विश्वासही बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप 300 पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना सूचना वरिष्ठ नेत्यांकडून दिलेल्या आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटणार असल्याचं सांगितलं जात होतं मात्र, हा तिढा नसल्याचं पाहायला मिळत आहे.