“मीडियासमोर वक्तव्य करून निर्णय होत नाही”, गृह खात्याच्या मागणीवर भाजपाचं प्रत्युत्तर
Chandrashekhar Bawankule : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला तरी देखील सरकार स्थापन झालेलं नाही. मुख्यमंत्रिपदाचा तिढा मिटला नसल्याने सरकार स्थापनेला विलंब होत आहे. विरोधकांनी या मुद्द्यावर टीकेचं काहूर तर उठवलंच आहे पण महायुतीततही राजकारणचे वेगवेगळे डाव टाकले जात आहे. शिवसेनेला जर मुख्यमंत्रिपद मिळणारच नसेल तर गृहमंत्रिपद मिळावं अशी मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही शिंदेंनी ही मागणी केली होती. मात्र भाजपने नकार दिला आहे.
यानंतर आज मुंबईत महायुतीची बैठक होणार होती. मात्र एकनाथ शिंदे अचानक गावी निघून गेल्याने या बैठकाही लांबणीवर पडल्या आहेत. यातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार” शिंदे गटाच्या आमदाराचं खळबळजनक विधान
आधीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांच्याकडे गृहमंत्रिपद सुद्धा होतं. तेव्हा आता जर भाजपकडे मु्ख्यमंत्रिपद राहणार असेल तर शिवसेनेकडे गृहमंत्रिपद यायला हवं असे आमदार संजय शिरसाट यांनी केलं होतं. याबाबात विचारले असता बावनकुळेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, सरकार स्थापनेच्या चर्चा या अशा पद्धतीने प्रसारमाध्यमांच्या बातम्यांद्वारे होत नाहीत.
काही निर्णय घ्यायचाच असेल तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तिन्ही नेते घेतील. तिन्ही नेते एकत्र बसून चर्चा करतील. त्यानंतर काय तो निर्णय होईल. या निर्णयाला भारतीय जनता पार्टीचे केंद्रिय नेतृत्व मान्यता देईल. ही सोपी गोष्ट आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांना दिलेल्या बाईटमधून काही सरकार स्थापनेच्या चर्चा होत नसतात असा टोला बावनकुळेंनी संजय शिरसाट यांना लगावला.
एकनाथ शिंदे निकालानंतर शरद पवारांसोबत जाणार का? संजय शिरसाट यांनी दिलं उत्तर